How Many Countries Have Separated From India And How Many Times Indias Partition Indias News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Old Map of India :  सध्याच जग सोशल मीडियाचं जग आहे. यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली जाते. यामध्ये असं म्हटलं जातं की, भारत एकेकाळी अखंड भारत होता. पण अनेकवेळा फाळणी झाल्यामुळे भारतापासून वेगवेगळे देश तयार झाले.या चर्चेमध्ये एक सुर असतो की, भारताच्या शेजारी लागून जितके देश आहेत ते अखंड भारताचा (Old Map of India) भाग होते. देशाची अनेकवेळा फाळणी करण्यात आली होती. ही फाळणी पहिली ठिणगी पाकिस्तानच्या रूपाने पडली आणि बांगलादेश च्या फाळणीपर्यंत यात खंड पडला नाही. ज्या देशांना अखंड भारताचा भाग  मानला जातो ते देश भारताच्या अधिपत्याखाली कधीच नव्हते. पण कोणकोणते देश भारताचा भाग राहिले होते? आणि ज्या देशांना भारताचा भाग मानलं जातं, त्यामागी नेमकी कोणती गोष्ट आहे? तसेच भारताची  किती वेळा फाळणी करण्यात आली.. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया…

पाकिस्तान :

भारतापासून सर्वांत पहिल्यांदा पाकिस्तान वेगळा झाला होता. सद्यस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध फारसे चांगले नाहीत. पण एकेकाळी पाकिस्तान हा भारताचा भाग होता. ऑगस्ट 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांपासून वेगळे झाले आणि दोन्ही वेगवेगळे देश म्हणून घोषित करण्यात आले. पाकिस्तानची स्थापना धर्माच्या आधारावर करण्यात आली.

बांगलादेश :

आज जो स्वतंत्र बांगलादेश आहे, तो एकेकाळी भारताचा भाग होता. स्वातंत्र्याच्या काळात बांगलादेश पाकिस्ताना भाग होता. यामुळे या भागाला पूर्व पाकिस्तानच्या नावाने ओळखलं जातं होतं. परंतु 1971 मध्ये झालेल्या युद्धात बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा करण्यात आला. स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीसाठी भारताची महत्वाची भूमिका राहिली आहे. हे दोन्ही देश भारताच्या अधिपत्याखाली होते आणि ब्रिटीश इंडियाच्या नियंत्रणाखाली होते. परंतु काही कारणांमुळे दोन्ही देशाची फाळणी झाली. यानंतर स्वतंत्र देश म्हणून भारत व पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. असं म्हटलं जातं की, भारताच्या शेजारील अनेक देश भारताचा भाग होते.पण ब्रिटीशांनी सीमारेषा तयार करून त्यांना वेगळं केलं आणि भारतापासून हे देश वेगळे झाले. परंतु अनेक रिपोर्टसमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हे कोणतेही देश भारताच्या अधिपत्याखाली नव्हते आणि नियंत्रणाखालीही कधीच नव्हते. 

ब्रह्मदेश : 

खरे तर ब्रिटीशांची पहिली नजर ब्रह्मदेशावर होती. परंतु सुरुवातीलाच ब्रिटीश आणि ब्रह्मदेशांतील लोकांमध्ये खूप मोठे आंदोलन झाले होते. यामुळे ब्रिटीशांनी आणलेल्या सामानाचं मोठ्या पातळीवर बहिष्कार करण्यात आला. ही चिघळलेली परिस्थिती लक्षात घेऊन चाणाक्ष ब्रिटीशांनी ब्रह्मदेशाला भारतापासून वेगळे केले. 1932 नंतर ब्रह्मदेशातील स्थानिक लोकांकडून भारतीयांवर हल्ले होऊ लागले. हे निमित्त साधून ब्रिटीशांनी ब्रह्मदेशातील आंदोलन कमकुवत करण्यासाठी 1937 मध्ये ब्रह्मदेश भारतापासून वेगळ केला. 

अफगाणिस्तान :  

अफगाणिस्तानसुद्धा भारताचा भाग होता, असं म्हटले जाते. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या एकमेकांना सीमा लागून आहेत. जेव्हा अफगाणिस्तान  वेगळा झाला होता तेव्हा भारतावर ब्रिटीशांच राज्य होतं. 1919 मध्ये अफगाणिस्तान  स्वतंत्र झाला होता. त्यावेळी पाकिस्तानशी अफगाणिस्तानच्या सीमा जोडलेल्या होता. यानंतर पुढे काही वर्षानंतर अफगानिस्ताचे सरकार आणि ब्रिटीश इंडियात एक करार करण्यात आला. या करारानुसार दोन्ही देशात एक सीमरेषा तयार करण्यात आली.  

नेपाळ :

आजही अनेक लोक नेपाळ भारताचा भाग होता,असं म्हणतात. परंतु बऱ्याच अभ्यासकांनी असं म्हणणे आहे की, असं कधीच झालं नाही. कारण नेपाळ कधीच भारत आणि इतर कोणत्याही विदेशी शक्तींच्या अधिपत्याखाली नव्हता. याचं कारण उंच, डोंगराळ प्रदेशामुळे ब्रिटीशांना तिकडे जास्त लक्ष दिलं नाही. 

इतर बातम्या वाचा :

World : जगबुडी होणार? तिप्पट वेगाने वितळतायत ग्लेशियर्स, शास्त्रज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

[ad_2]

Related posts