[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Weather Update Today : देशाच्या हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम दिसून येत आहे. हवामान खात्याने (IMD) नवीन अपडेट जारी केलं आहे. आयएमडीच्या (IMD) ताज्या हवामान अंदाजानुसार मैदानी भागात पाऊस पडण्याची शकता आहे. डोंगराळ जिल्ह्यांत बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशसह काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि बर्फवृष्टीनंतर तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज आहे. डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्यामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. उत्तराखंडच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस आणि तीन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
तापमानात घट झाल्याने कडाक्याची थंडी
ख्रिसमसदरम्यान आज देशात स्वच्छ हवामान आणि सूर्यप्रकाश असेल, तर 29 डिसेंबरपासून तापमानात पुन्हा एकदा घट व्हायला मिळेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 29 आणि 30 डिसेंबरला मध्य आणि उंच डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज आहे. त्यामुळे नवीन वर्षात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागात थंडीची लाट आल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. तापमानात घट झाल्याने कडाक्याची थंडी जाणवत आहे.
‘या’ भागात दाट धुके पडण्याची शक्यता
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागांमध्ये खूप दाट धुके पडण्याची शक्यता आहे. याशिवाय ईशान्येकडील राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. सकाळी धुक्यामुळे लोकांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. हवामान खात्याने पंजाब आणि हरियाणामध्ये दाट धुक्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या मते, 24 डिसेंबर रोजी आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत दाट धुक्यासह गारठा वाढला
आज दिल्लीमध्ये कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 7 अंश राहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, दिल्लीमध्ये 29 डिसेंबरपर्यंत धुके कायम राहील. या काळात तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यासोबतच आज सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज उत्तर प्रदेशच्या विविध भागात दाट ते दाट धुके पडण्याची शक्यता आहे. याशिवाय हरियाणाच्या विविध भागात दाट धुक्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर पश्चिम राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, दक्षिण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि अंतर्गत ओडिशाच्या बहुतांश भागांमध्ये गेल्या 24 तासांत किमान तापमान 6-12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
[ad_2]