Pune Crime News Husband Kills Wife By Punching Her Chest For Not Giving Her Food Shocking Incident In Katraj

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे: जेवण न दिल्यामुळे महिलेला बेदम मारहाण (Pune Crime) करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज (Katraj Murder) भागातील दत्तनगर परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) पतीला अटक केली. पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तानाजी कांबळे (Tanaji Kamble) असे नराधम पतीचे नाव आहे.  त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Katraj Wife Murder)  करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुरा तानाजी कांबळे (वय 42, रा. स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.  याबाबत मुलगा पियूष तानाजी कांबळे (वय 19) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नराधम पती  व्यावसायाने पेंटर असून रोजंदारीवर काम करत होता. कांबळे दररोज घरी येताना मद्यपान करून येत असे. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास तानाजी नेहमीप्रमाणे मद्यपान करून घरी आला होता. यावेळी त्याने त्याच्या पत्नी माधुरीला जेवायला वाढण्यास सांगितले. यावर तिने त्याला जेवण न बनवल्याचे उत्तर दिले. जेवण न दिल्याच्या रागातून तानाजीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरू केलं. यादरम्यान त्याने पत्नी मधुराच्या छातीवर जोर जोरात बुक्क्या मारल्या या मारहणीनंतर माधुरी खाली कोसळली. मारहाणीत मधुरा गंभीर जखमी झाली आणि यात तिचा मृत्यू झाला.

मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू

नराधम पती आणि पत्नीमध्ये वाद होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. दोघांमध्ये घरगुती कारणावरून वारंवार भांडणे होत असत. दरम्यान,शुक्रवारी आरोपीचे त्याच्या पत्नीशी पुन्हा भांडण झाले. भांडण झाले त्यावेळी पती तानाजी कांबळे मद्यधुंद अवस्थेत होता. जेवण का बनवले नाही आणि त्यातूनच वाद सुरु झाला. आरोपीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.

दारूसाठी आईने विरोध करताच डोक्यात लोखंडी मुसळ घालून जीव घेतला

लातूर  जिल्ह्यात दारुसाठी मुलानेच आपल्या आईच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून तिचा निर्दयीपणे हत्या (Murder) केली आहे. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास आईने नकार दिला होता, त्यामुळेच या दारूड्या मुलाने आईचा जीव घेतला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संगीता नाथराव मुंडे (वय 40 वर्ष रा. सताळा, ता. अहमदपूर) असे मारहाणीत मयत झालेल्या आईचे नाव असून, ज्ञानेश्वर नाथराव मुंडे (वय 23 वर्ष) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

हे ही वाचा :

 

[ad_2]

Related posts