[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…
ABP Cvoter Opinion Polls: राहुल गांधींच्या कामानं जनता किती समाधानी? सर्वेक्षणाचा धक्कादायक खुलासा
Lok Sabha Election 2024 Opinion Poll: नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनिती आखत आहे. भाजप (BJP) तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे. तर, काँग्रेससह (Congress) देशातील इतर विरोधी पक्षांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. वाचा सविस्तर
Weather Update : डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज, आजचं हवामान कसं असेल?
Weather Update Today : देशाच्या हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम दिसून येत आहे. हवामान खात्याने (IMD) नवीन अपडेट जारी केलं आहे. आयएमडीच्या (IMD) ताज्या हवामान अंदाजानुसार मैदानी भागात पाऊस पडण्याची शकता आहे. डोंगराळ जिल्ह्यांत बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशसह काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि बर्फवृष्टीनंतर तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज आहे. डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्यामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. उत्तराखंडच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस आणि तीन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
SBI FD Scheme: SBI ची मस्त योजना; 400 दिवसांच्या गुंतवणुकीवर भरघोस व्याज, फक्त 7 दिवसच शिल्लक
SBI Amrit Kalash FD Scheme: आता 2023 वर्ष संपायला फक्त एक आठवडा उरला आहे आणि नवीन वर्ष 2024 (New Year 2024) च्या स्वागताची तयारीही देशभरात जोरात सुरू झाली आहे. या डिसेंबर महिन्याबरोबरच अनेक महत्त्वाच्या कामांची मुदतही संपुष्टात येत आहे. या महत्त्वाच्या कामांमध्ये गुंतवणुकीशी संबंधित योजनांचाही समावेश आहे, त्यापैकी एक SBI अमृत कलश FD योजना (SBI Amrit Kalash FD Scheme) आहे, ज्यामध्ये 400 दिवसांच्या गुंतवणुकीवर प्रचंड व्याज दिलं जात आहे. त्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 रोजी संपणार आहे. वाचा सविस्तर
India vs South Africa Test Series: सचिन तेंडुलकर, कपिल देव अन् सौरव गांगुली; जे कोणीच करू शकलं नाही, ते रोहित करणार?
India vs South Africa Test Series: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर असून, आतापर्यंत त्यांनी येथे चमकदार कामगिरी केली आहे. सर्वात आधी, सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. यानंतर केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका (ODI Series) 2-1 नं जिंकून इतिहास रचला. वाचा सविस्तर
Arbaaz Khan Wedding : मलायकासोबतच्या घटस्फोटानंतर 6 वर्षांनी अरबाज खान चढला बोहल्यावर; वयाच्या 56व्या वर्षी गर्लफ्रेंड शुरा खानसोबत बांधली लग्नगाठ
Arbaaz Khan Shura Khan Wedding : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) वयाच्या 56 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. अर्पिता खानच्या घरी अरबाजचा लग्नसोहळा पार पडला आहे. गर्लफ्रेंड शुरा खानसोबत (Shura Khan) त्याने दुसरं लग्न केलं आहे. शुरा ही मेकअप आर्टिस्ट आहे. वाचा सविस्तर
Surya Grahan 2024 : 2024 नववर्षात पहिले सूर्यग्रहण कधी होणार? भारतात दिसणार की नाही? जाणून घ्या
Surya Grahan 2023 : चंद्र आणि सूर्यग्रहण ही दोन्ही खगोलीय घटना आहेत, जी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्या स्थितीमुळे उद्भवतात. ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाचे विशेष महत्त्व मानले जाते. सूर्य हा आत्म्याचा कारक मानला जातो, म्हणून जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा त्याचा पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व जीवांवर नक्कीच काही ना काही प्रभाव पडतो. 2023 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी झाले होते, तर या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर रोजी झाले होते. सन 2024 मध्ये सूर्यग्रहण कधी होणार आहे ते जाणून घेऊया… वाचा सविस्तर
Today In History : आज राष्ट्रीय सुशासन दिवस, चार्ली चाप्लिन यांचं निधन ; इतिहासात आज
What Happened on December 25th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 25 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत. यात महत्वाचं म्हणजे आज जगभरात ख्रिसमस अर्थात नाताळचा सण साजरा केला जातो. त्याशिवाय आजच दिवस भारतामध्ये राष्ट्रीय सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. तर आजच्या दिवशी चार्ली चाप्लिन यांचं निधन झालं होतं. 25 डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशात अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्तींचं ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते. अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो. पाहूयात आजच्या दिवशी इतिहासात काय काय घडलेय… वाचा सविस्तर
Horoscope Today 25 December 2023 : आज नाताळ! सर्व 12 राशींसाठी आजचा सोमवार कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 25 December 2023 : राशीभविष्यनुसार आज म्हणजेच 25 डिसेंबर 2023, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीच्या लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. ज्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. आज कन्या राशीच्या लोकांचे चुकीचे विचार तुमची प्रगती रोखू शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या… वाचा सविस्तर
[ad_2]