Pune Mumbai Expressway Traffic Jam News Car Stops In Traffic

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Mumbai Expressway News : सलगच्या सुट्ट्या लागल्या म्हणून मुंबईतील (Mumbai News) लोक पर्यटन स्थळ अथवा आपापल्या गावी जातात. एकाचवेळी मुंबईकर बाहेर पडत असल्यानं, त्याचा परिणाम मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (pune mumbai expressway news) होतोय. त्यामुळं बोरघाटात (Bhor Ghat) अभूतपूर्व वाहतूक कोंडी (traffic jam) होते. प्रवाशांना नेहमीच याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अशातच आता आणखी एक नवी समस्या वाढली आहे. जी केवळ प्रवाश्यांची नव्हे तर महामार्ग पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (pune mumbai expressway news) प्रवाश्यांची नवी डोकेदुखी वाढलीये. विक एंडला लागून ख्रिसमस आल्यानं मुंबईकर एकाचवेळी पर्यटन स्थळ गाठायला बाहेर पडलेत. पण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अशात कपिल होटकर या चालकाची चांगलीच तारांबळ झाली. वाहतूक कोंडीमुळं त्यांच्या गाडीच्या इंजिनवर ताण आला अन् त्यांची गाडी जागेवर बंदचं पडली. कपिल होटकर प्रमाणे शेकडो चालकांची वाहन अगदी मध्यरात्री बंद पडली. त्यामुळं ही वाहन नेमकी का बंद पडतायेत ? असा प्रश्न निर्माण झालाय.

कोणत्या कारणामुळे गाडी बंद पडते ?

वाहनांच्या रांगांमध्ये गाडी चढावर असेल तर इंजिनवर ताण येतो. 
परिणामी गाडीचं इंजिन गरम होऊन, जागेवर बंद पडते. 
क्लच प्लेट जळते, त्यामुळं जागेवरच ब्लॉक होते.
ऑयलची पातळी खालावली असेल तर इंजिन जाम होते.
बॅटरीचं चार्जिंग संपल्यावर ई-व्हेईकल बंद जागेवर बंद पडते.

एकामागोमाग एक वाहन बंद पडली की वाहतूक कोंडीत आणखीच भर पडते. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अनेकदा गाड्या बंद पडल्या, त्यामुळे वाहतूककोंडीमध्ये आणखी भर पडली आहे. ऐन वाहतूक कोंडीमध्ये गाडी बंद पडण्याची वेळ तुमच्यावर येऊन द्यायची नसेल. तर, काय करावे.  

वेळेवर गाड्यांचं मेंटेनन्स करायला हवं.
क्लच वर लोड येणार नाही, याची चालकाने खबरदारी घ्यावी.
चढावर पहिल्या गिअरमध्ये वाहन चालवावी.
गाडी सुस्थितीत नसेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे
गाडीत गरजेची साधन सामुग्री ठेवायला हवीच.
ई-व्हेईकलचा वापर लांबच्या प्रवासासाठी टाळावा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या कोंडीला बेशित अवजड वाहतूक जबाबदार ठरते हे उघड आहे. तरी सुट्ट्यांच्या काळात या अवजड वाहतुक महामार्गावर आणू नका, एवढंच आवाहन करण्यात महामार्ग पोलीस धन्यता मानतात. सलगच्या सुट्ट्यांवेळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अशी परिस्थिती प्रत्येकवेळी उद्भवते. याची कल्पना महामार्ग पोलिसांना असतेच तरी त्यांच्याकडून सुट्ट्यांच्या काळात अवजड वाहतुकीचा बंदोबस्त लावला जात नाही. केवळ आवाहन करून नव्हे तर प्रत्यक्षांत कृती करण्याची आता गरज आहे, अन्यथा ही डोकेदुखी कायमची वाढणार यात शंका नाही. 

[ad_2]

Related posts