Pune Crime News Update Chaturshringi Police Station 2 Theft Stolen Gold Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime News Update : पुणे – पुण्यात चोरट्यांची नवी हातचलाखी समोर आली आहे. “दागिन्यांना स्पर्श करा, पाया पडून शनी देवाला जातो” म्हणत पुण्यात चोरट्यांनी (pune theft news) 68 वर्षीय महिलाला चुना लावलाय. याप्रकरणी चतुष्रुंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे. चोराच्या या नव्या हातचलाखीची पुण्यात (Pune News) जोरदार चर्चा सुरु आहे. 

दागिने देवाला दाखवून येतो म्हणत हातचालाखी – 

पुण्यात दोन चोरट्यांनी 68 वर्षीय महिलेच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या. “दागिन्यांना स्पर्श करा, पाया पडून शनी देवाला जातो” म्हणत दोन चोरट्यांनी हातचलाखी केली. 
सोन्याचे दागिने देवाला दाखवून येतो, असे सांगत या दोन चोरट्यांनी महिलेला  गंडा घातला. याप्रकरणी त्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. 

चोरट्यांनी कसा घातला गंडा ? पुण्याच चोरीची नवी पद्धत –

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या त्यांच्या दुकानात काम करत होत्या. त्याठिकाणी दोन अनोळखी व्यक्ती आले आणि त्यांनी महिलेला “माझे गुरू यांनी आज शनिवार असल्याने सोन्याच्या दागिन्यांना स्पर्श करुन पाया पडून शनिदेवाला जा”, असे सांगितले. तसेच त्या चोरट्यांनी महिलेला “माझ्या हातात द्या मी पाया पडून लगेच परत करतो” असे देखील सांगितले. 

दोघांवर गुन्हा दाखल – 

चोरट्यांच्या या भूलथापाला बळी पडत त्या महिलेने हातातील सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या. चोरट्यांनी बांगड्या एका कागदात गुंडाळून त्याचेकडील असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्या. त्यानंतर पिशवीचे तोंड गाठ बांधून बंद केले. फिर्यादी यांनी बांगड्या परत करा, असे सांगितले असता त्या चोरट्यांनी पिशवी परत केली आणि तिथून पळ काढला. त्यात बांगड्या नव्हत्या.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाणे गाठले. महिलेच्या तक्रारीनंतर दोन अनोळखी व्यक्तींवर चतुष्रुंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

आणखी वाचा :

धक्कादायक! बारामतीत विवाहितेचा छळ, हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून मारले

[ad_2]

Related posts