2023 Most Played Youtube Songs Check Online Steps Tech News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

2023 Most Played Youtube Songs : 2023 मध्ये युट्यूब (You Tube)  म्युझिकवर (Music List) तुम्ही सर्वाधिक कोणतं गाणं ऐकलं? हे तुम्हाला माहित आहे का? कदाचित माहित नसेल कारण युट्यूबवर अनेक लोक अनेक वेगवेगळ्या पद्धतीची गाणी ऐकत असतात. युट्युब म्युझिकवर तुम्ही सर्वाधिक कोणतं गाणं ऐकलं हे जाणून घ्यायचं असेल तर आम्ही तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहोत. यासाठी  तुमच्याकडे युट्युब सबस्क्रिप्शन असणे अनिवार्य आहे. इथून तुम्ही ऐकलेल्या टॉप 5 गाण्यांची लिस्ट मिळवू शकता. तर चला जाणून घेऊया नक्की याची प्रक्रिया कशी आहे. 

या पद्धतीने ऑनलाईन जाणून घ्या –

1) सगळ्यात अगोदर यूट्यूब म्युझिक ओपन करा. 
2) यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या ‘प्रोफाइल आयकॉनवर’ टॅप करा. मग जेव्हा तुम्ही स्क्रॉल डाउन करणार     तेव्हा तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील. 
3) जिथे तुम्हाला ‘your Recap’ हे ऑप्शन्स दिसेल. त्यावर टॅप करा. 
4) त्यानंतर ‘ Get Your Recap’ या ऑप्शन वर क्लिक करा.
5) तुम्हाला स्टेटसच्या स्वरूपात डिटेल दिसेल. 

 

तुम्ही कोणत्या गायकाचे फॅन आहात?

या पद्धतीने तुम्ही 2023 मध्ये टॉप 5 ऐकलेल्या गाण्यांची यादी मिळवू शकता. त्यासोबतच तुम्ही या वर्षांमध्ये किती मिनिटे गाणी ऐकला आणि कोणती नवीन गाणी ऐकलात ही माहिती सुद्धा तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे कोणत्या आर्टिस्ट्स ना तुम्ही जास्त ऐकलं हे समजेल.यामध्ये टॉप 5 कोण होते हे तुम्हाला कळेल आणि  तुम्ही कोणाचे चाहते आहात हे सुद्धा तुम्ही जाणू शकता. तुम्ही तुमचे अल्बम कव्हर देखील बनवू शकता आणि शेवटी ही सगळी डिटेल तुम्ही कोणा दुसऱ्या सोबतसुद्धा शेअर करू शकता. 

म्युझिक बद्दलची टेस्ट तुम्हाला कळेल?

या पद्धतीने तुम्ही जाणू शकता की तुम्ही कोणत्या टेस्टचे म्युझिक ऐकले आहे. म्हणजेच  रोमान्स, दुःखी ,मस्ती ,अल्बम गझल किंवा कव्वाली या पद्धतीतील तुम्ही कोणती गाणी ऐकली हे तुम्हाला कळू शकेल. अनेक लोकांना डिजे गाणी ऐकायला आवडतात. तर अनेकांना सायलेंट गाणी ऐकायला आवडतात. त्यासोबत अनेकांना मुड पाहून गाणी ऐकायला आवडतात. आपलं मूड आणि आपल्यातील भावना आपण गाण्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे गाणी ऐकल्यावर आपल्याला फ्रेशदेखील वाटतं. 

इतर महत्वाची बातमी-

Apple Gadgets : Apple Device वर भन्नाट ख्रिसमस ऑफर्स; स्वस्तात मिळतोय Apple MacBook Air, MacBook Pro, iphone 15!

[ad_2]

Related posts