Nike Layoffs 2023 To Cut Hundreds Of Jobs In New Year Will Cost Cutting 2 Billion Dollars Business Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nike Layoff: जागतिक स्पोर्ट्सवेअर ब्रँड Nike नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. Nike येत्या काही दिवसात आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. कंपनीने पुढील तीन वर्षांत खर्चात 2 अब्ज डॉलर्सची कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी कंपनी ऑटोमेशनवर भर देणार आहे. गेल्या आठवड्यात Nike ने वार्षिक महसूल अंदाज कमी करून 2 अब्ज खर्चामध्ये बचत करण्याची योजना आखली आहे.

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, नायकी कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की, कर्मचार्‍यांच्या कामावरून कमी करण्यासाठी 400 ते 450 दशलक्ष डॉलर्स खर्च होतील. मात्र कंपनीने किती लोकांना कामावरून काढून टाकले आहे याचा खुलासा केलेला नाही. या वर्षी मे महिन्यात, नायकीमध्ये एकूण 83,700 कर्मचारी होते, तर 2022 मध्ये त्यांची संख्या 79,100 होती. ऑटोमेशन वाढवण्यासोबतच Nike उत्पादनात बदल करणार आहे आणि कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन फ्रेश स्टाइल उत्पादने देखील लॉन्च करणार आहे.

Nike चे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅट फ्रेंड यांनी सांगितले की, जगभरातील ग्राहक खूप सावध झाले आहेत. ग्राहक नाविन्यतेच्या शोधात असतो, तेव्हा नवीनता आणि नावीन्य हे ग्राहकांना प्रेरित करते. त्यासाठी ऑटोमेशनची गरज आहे. 

ऑनलाइन विक्रीतील घसरणीसाठी नायकीने हाँगकाँग, तैवान आणि मकाऊ यांचा समावेश असलेल्या ग्रेटर चायनामध्ये बदललेल्या गोष्टींना जबाबदार धरले आहे. 30 नोव्हेंबरला संपलेल्या तिमाहीत Nike च्या स्टोअरच्या विक्रीत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर डिजिटल विक्रीत 22 टक्क्यांनी घट झाली आहे. Nike च्या या निर्णयानंतर कंपनीच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची घसरण झाली. या घसरणीचा परिणाम इतर स्पोर्ट्सवेअर कंपन्यांच्या शेअरवरही दिसून आला आहे.

पेटिएमने एक हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला

ऑनलाईन पेमेंट सेवा देणाऱ्या पेटीएम  या दिग्गज कंपनीच्या व्यवस्थापनानं नवं वर्ष सुरू होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सनं 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. 

बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या ईकोनॉमिक टाईम्सच्या अहवालात असं नमूद केलं आहे की, 2023 वर्ष संपण्यापूर्वीच पेटीएमनं मोठी नोकरकपात केली आहे. पेटीएमनं (Paytm Lay Off) कर्मचाऱ्यांना मोठा दणका देत, एका झटक्यात एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 

Paytm नं खर्चात कपात आणि व्यवसाय सुव्यवस्थित करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही मोठी टाळेबंदी केली आहे. यासोबतच आगामी काळात असे आणखी निर्णय घेतले जाण्याची शक्यताही कंपनीनं वर्तवली आहे. अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत अशा अनेक नोकर कपातीच्या बातम्या समोर आल्या आहेत.  

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts