[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Corona Vaccine : कोरोनाची (Coronavirus) डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे. देशात सध्या कोरोना रुग्ण (Corona Patients) वाढताना दिसत आहेत. कोरोनाचा नवीन सब-व्हेरियंट (Corona New Variant) हात-पाय पसरताना दिसत आहे. सध्या देशात चार हजारहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण (Active Corona Cases) असून यातील बहुतेक रुग्ण नवीन कोरोना व्हेरियंटचे (Corona Variant) आहेत. यामुळे केंद्र सरकार अलर्टवर असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे. केंद्र सरकारने राज्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
नवीन JN.1 व्हेरियंटवर कोरोना लस किती प्रभावी?
देशात कोरोनाचा नवीन व्हेरियंट काही राज्यांमध्ये परसला आहे, पण त्याव्यतिरिक्तही आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशासह जगभरात जोरदार तयारी सुरु असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाचा नवीन JN.1 सब-व्हेरियंट हा कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार आहे. देशात गेल्या 24 तासांत 74 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील JN.1 सब-व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 63 वर पोहोचली आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोकं वर काढल्यामुळे आता कोरोना लस या व्हेरियंटवर किती प्रभावी आहे आणि कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्याची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित आहे. तज्ज्ञांचं यावर काय मत आहे जाणून घ्या.
[ad_2]