[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
सांधेदुखीपासून सुटका
PharmEasy ने केलेल्या अहवालानुसार, खजूरामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते आणि याचे सेवन केल्याने पचनतंत्र व्यवस्थित होते. ज्याचा शरीरावर चांगला परिणाम होऊ बद्धकोष्ठता, गॅस, शरीरावरील सूज येणे यासापासून दूर ठेवण्यास मदत करते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांना यापासून फायदा मिळतो. खजुरामध्ये असणारे कार्ब्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर, लोह आणि विटामिन बी६ असे पोषक तत्व सांधेदुखीपासून दूर राहण्यास मदत करते.
मेंदू होतो तरतरीत
खजूर रोज ७ दिवस जर भिजवून खाल्ले तर मेंदू तरतरीत होण्यास मदत मिळते. खजुराच्या सेवनाने बुद्धीचा विकास होतो असे सांगण्यात येते. PubMed ने केलेल्या अभ्यासानुसार, रोजच्या खजुराच्या सेवनाने अल्झायमरसारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत मिळते. स्मरणशक्ती सुधारण्यास फायदा होतो.
(वाचा – ब्लड शुगर कमी करण्यासाठी अश्वगंधा वापरण्याच्या ५ पद्धती, डायबिटीस राहील कायम नियंत्रणात)
ब्लड शुगरवर राहते नियंत्रण
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी खजुराचे सेवन करणे फायदेशीर ठरते. याच्या सेवनाने मधुमेहदेखील नियंत्रणात येण्यास मदत मिळते. खजुरामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असून डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यास याचा फायदा होतो. मात्र डायबिटीसच्या रूग्णांनी याचे किती सेवन करावे याबाबत डॉक्टरांशी सल्लामसलत करावी.
(वाचा – या सवयींमुळे वाढतात पोटांचे टायर्स, वजन वाढीने व्हाल हैराण, वेळीच आळा घाला)
हाडे मजबूत होण्यासाठी
खजुराच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. हाडांच्या आरोग्यासाठी नियमित याचे सेवन केल्याने योग्य पोषक तत्व मिळून मजबूती मिळते. मात्र रोज २ ते ३ पेक्षा अधिक खजुराचे सेवन करणे योग्य ठरणार नाही. किती खजूर खावे हे तुमच्या न्यूट्रिशनकडून समजून घ्या.
(वाचा – रक्तात मिसळलेले युरिक अॅसिड खेचून बाहेर फेकते हे सरबत, आयुर्वेदातील चमत्कारी उपाय)
रक्ताची कमतरता भासणार नाही
खजुराचे सेवन केल्याने एनिमियासारखे आजार दूर राहण्यास मदत मिळले. PubMed ने दिलेल्या अहवालानुसार, खजुरामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत मिळते. गर्भावस्थेत महिलांना अनेकदा लोहाची कमतरता भासणे अथवा एनिमियासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने खजुराचे सेवन दुधासह करता येते.
[ad_2]