Shankhnad Pathak Of Pune Invited To The Consecration Ceremony In Ram Temple In Ayodhya

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Keshav Shankha Pathak :  देशातील प्रत्येक महत्वाच्या मोहिमेत पुणेकरांचा मोठा सहभाग असतो. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत (Ram temple) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी देशभरात मोठी तयारी सुरु आहे. तशीच तयारी पुण्यातदेखील सुरु आहे. पुण्यातील एकमेव शंख पथकाला अयोध्येत खास आमंत्रण देण्यात आलं आहे. पुण्यातील  केशव शंखनाद पथक अयोध्येत शंखनाद करणार आहे. 

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंदर्भात केशव पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांना पत्र पाठवले आहे. हे आमंत्रण पुण्यासाठी अभिमानाची बाब आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. सगळेच महत्वाच्या सोहळ्यासाठी शंखनाद करण्यासाठी उत्सुक आहे, असं अध्यक्ष नितीन महाजन यांनी सांगितलं आहे. 

शंखनाद पथकाचं ‘केशव’च नाव का?

आपली धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक, वाद्यं का आणि कशासाठी वाजवली जात होती आणि त्याने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे होतात. यासाठी पथकाच्या माध्यमातून शंखाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने केशव शंखनाद पथक तयार करण्यात आलं आहे. ज्यांनी जगाला गीतेच्या उपदेश देवून समाज घडविण्यासाठी प्रेरणा दिली, त्या भगवान श्रीकृष्णचे नावही केशव आहे. अखंड हिंदुस्तानातील हिंदूसमाजाला संघटित करून देव देश धर्मासाठी काम करण्याची शिकवण देवून परम पवित्र भगवा ध्वज आपले गुरू स्थानी ठेवून एकत्रित केलं असे संघ संस्थापक आद्यसरसंघचालक डॉ केशव हेडगेवार यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळे नावाने संपूर्ण जगात शंख ध्वनीने परिवर्तन व्हावे, असं आम्हाला वाटतं, असं पथकाच्या प्रमुखांनी सांगितलं आहे.

2017 पासून शंखनाद पथकाची सुरुवात

2017 मध्ये गणेशोत्सवात शंखनाद करायचा या उद्देशाने शंखनाद पथकाचा सराव पुण्यातील प्रसिद्ध ओमकारेश्वर मंदिरात एक महिना सराव सुरू केला त्यात महिला आणि पुरुषसंख्या फक्त पाच ते सात होती नंतर ती वाढतच गेली. पुण्यातील प्रमुख गणेश मंडळाच्या आरतीला उपस्थित राहून शंखनाद करत होतो. त्यानंतर गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत मानाचे गणपतीत  स्थिर वादन करू लागलो. 

शंखनादासोबतच पारंपारिक दुर्मिळ वाद्यांचंदेखील वादन

हे पथक पुण्यातील एकमेव शंखनाद पथक आहे. या पथकात  पाचशेहून अधिक वादक आणि संगितकार आहेत. त्यापैकी 90 टक्के महिला आहेत. विशेष म्हणजे यात 5 ते 85 वयोगटातील संगीतकारांचा आणि वादकांचा  समावेश आहे. आता हेच सगळे अयोध्येत वादन करण्यासाठी तयारीला लागले आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Ram Mandir : राम मंदिर उद्घाटन सोहळा, महाराष्ट्रात आतापर्यंत कोणाला मिळालं आमंत्रण?

[ad_2]

Related posts