Ayodhya Ram Mandir List Of 350 People In Mumbai Is Ready For The Inauguration Of Ram Temples Raj Thackeray Uddhav Thackeray

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  राम मंदिर (Ram Mandir) रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेसाठीची लगबग सुरू आहे. मंदिरातील बांधकामाचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. तर, अयोध्येत जाण्यासाठी भाविकांसह राजकीय पक्षांचीही लगबग सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे 
श्री रामजन्मभूमी ट्रस्टच्या विश्वस्तांनी निमंत्रण पत्रिक पाठवण्याची सुरुवात झाली आहे.  22 जानेवारीला अयोध्येच्या (Ayodhya) श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुंबईतील जवळपास साडेतीनशे व्हीव्हीआयपींना निमंत्रण देण्यात आली आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज  ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी  मुंबईतून निमंत्रित असलेल्या व्हीव्हीआयपीची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील संत महंत, राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख अध्यक्ष, खेळाडू, चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, मोठे उद्योगपती काही महत्त्वाचे सेलिब्रिटीज यांना निमंत्रण दिले जाणार आहे. या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.आज, उद्यापर्यंत राज आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

आज किंवा उद्या मिळणार निमंत्रण

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या  या नावाने सर्वांना निमंत्रण पाठवले जाणार यासाठी प्रचारक म्हणून जबाबदाऱ्यांचे वाटप सुद्धा करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना सुद्धा या सोहळ्याचा निमंत्रण पाठवला असून आज किंवा उद्यामध्ये निमंत्रण मिळणार असल्याची  माहिती सूत्रांनी दिली आहे. 

निमंत्रणावरुन नाराजी नाट्य?

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार यांनी म्हटलं होतं की, आम्हाला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण येणार नाही. अडवाणींना ज्यासाठी आमंत्रण दिलं गेलेलं नाही त्याचं कारणास्तव आम्हाला आमंत्रण दिलं गेलेलं नाही. कारण आमचं त्याच योगदान आहे. आम्ही त्या प्रकरणातले आरोपी आहोत.  ज्यांचं काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार काही नाही अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. परंतु विश्वस्त समितीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.  

हे ही वाचा :

राज्याच्या रामभूमीत भाजप फोडणार प्रचाराचा नारळ, राम मंदिर लोकार्पण सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर

                  

[ad_2]

Related posts