Liquor Sale Serving Deadline EXTENDED For New Years In Pune Heres All You Need To Know

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune : पुण्यातील मद्यप्रेमींना महाराष्ट्र सरकारने  खुशखबर दिली आहे. 31 डिसेंबर म्हणजेच थर्टी फर्स्टला मद्य विक्री करण्याची वेळ वाढवली आहे, पहाटे पाच वाजपर्यंत आता दारु मिळणार आहे. 31 डिसेंबर रोजी वाईन शॉप (Wine Shop) मध्यरात्री 1 पर्यत सुरू राहणार आहेत. तर बीअर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यामुळे मद्यप्रेमींना थर्टीफर्स्ट (31 December Party) धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. (Pune News)

महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 139 (1) (C) आणि कलम 143) (2) (H) (4) अन्वये नववर्षानिमित्त 31 डिसेंबरला राज्यातील विविध मद्य दुकानं निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय   31 डिसेंबरच्या निमित्ताने अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस विभागाच्या पथकांचे लक्ष असणार आहे. अवैध दारू विकणाऱ्या वर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची करडी नजर असणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विश्वजित देशमुख यांनी दिली आहे.

पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी – 

एफएलडब्ल्यू-2, उच्च दर्जाची किंवा अतिउच्च दर्जाची, विदेशी मध्य विकणाऱ्या किरकोळ विक्रीच्या दुकानास 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान उघडं ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. एफएल-3 (परवाना कक्ष)च्या मदिरायलायांना पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्रीची मुभा राहील. तर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत दारुच्या दुकानांना मुभा असेल.

महानगरामध्ये पाच तर इतर ठिकाणी 1 वाजेपर्यंत मुभा – 

नववर्षाच्या स्वागतासाठी चालणाऱ्या  थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर विरजण पडू नये म्हणून 31 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत मद्य विक्रीस परवानगी दिली आहे, तर महानगरांमध्ये पहाटे 5 वाजेपर्यंत ही परवानगी आहे. पुणे आणि मुंबईमध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत मद्य विक्री होणार आहे. 

एक दिवसाच्या परवानाची गरज – 

दारू पिण्यासाठी एक दिवसाचा तात्पुरता परवाना आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईत विनापरवाना दारू पिताना कुणी आढळले अथवा दारू पिऊन वाहन चालवताना आढळले तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याला पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे.

[ad_2]

Related posts