Dhirubhai Ambani Birthday Do You Know How Much Wealth Dhirubhai Ambani Had Left For Mukesh And Anil Ambani 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dhirubhai Ambani: आज (28 डिसेंबर) देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांची जयंती आहे. आज ते असते तर त्यांचे वय 91 वर्षे झाले असते. गुजरातमधील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या धीरुभाई अंबानी यांची भारतीय व्यावसायिक म्हणून सुरुवात अत्यंत कठीण परिस्थितीत झाली होती. त्याआधी त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. कुटुंबात पैशांच्या कमतरतेमुळं त्यांना मॅट्रिकनंतर शिक्षण सोडावे लागले होते. त्यानंतर त्यांना तरुण वयात येमेनला जाऊन पेट्रोल पंपावर काम करावे लागले होते. दरम्यान, धीरुभाई अंबानी यांनी मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  आणि अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यासाठी किती संपत्ती सोडली होती? याबाबतची माहिती पाहुयात.

धीरुबाई अंबानी यांनी भारतात परतल्यावर त्यांनी मुंबईत भाड्याच्या घरातून रिलायन्सची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी कपड्यांचा व्यवसाय पुढे नेला. त्यानंतर, पेट्रोकेमिकल, रिफायनिंग, टेलिकॉम आणि इतर क्षेत्रांमध्ये व्यवसायाचा विस्तार केला. एका मोठ्या व्यावसायिक समूहात त्याचे रूपांतर केले. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की धीरूभाई अंबानी हे जग सोडून गेले तेव्हा त्यांच्याकडे किती संपत्ती होती? मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी या दोन मुलांसाठी त्यांनी किती संपत्ती सोडली? 

धीरुभाई अंबानींनी किती संपत्ती सोडली?

धीरुभाई अंबानी हे त्यांच्या काळात देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. 2002 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा ते जगातील 138 व्या श्रीमंत उद्योगपतींपैकी एक होते. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती 2.9 अब्ज डॉलर होती. आजच्या डॉलरच्या मूल्यानुसार भारतीय रुपयात पाहिल्यास ते 24 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन 17.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर त्यांच्या काळात रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन 60 हजार कोटींवर पोहोचले होते.

धीरूभाई अंबानी यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी

धीरुभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातमधील चोरवाड गावात झाला.

येमेनमधील पेट्रोल पंपावर काम करुन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1958 मध्ये ते स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी भारतात परतले.

1966 मध्ये, धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली, जी नंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) बनली. ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक आहे.

धीरूभाई अंबानी यांनी भांडवली बाजाराची संकल्पना मांडली आणि भारतातील इक्विटी संस्कृतीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रिलायन्स इंडस्ट्रीज ही 1977 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध होणारी पहिली भारतीय कंपनी ठरली.

धीरूभाई अंबानींचे व्यवसाय साम्राज्य कापड उद्योगाच्या पलीकडे पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग, तेल, दूरसंचार आणि इतर क्षेत्रांपर्यंत विस्तारले. रिलायन्स इंडस्ट्रीजला विविध उद्योगांमध्ये आपली उपस्थिती वाढवून वैविध्यपूर्ण समूह बनवण्यात आले.

धीरूभाई अंबानी हे उद्योजकतेचे खंबीर समर्थक होते आणि लोकांना संधी देऊन सक्षम करण्यावर त्यांचा विश्वास होता. अंबानी यांनी लहान गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक करून भारताच्या आर्थिक विकासात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

धीरूभाई अंबानी यांची धोरणात्मक कुशाग्रता, भांडवली बाजारातील त्यांचे अग्रगण्य प्रयत्न आणि संसाधने एकत्रित करण्याची त्यांची क्षमता यामुळे त्यांना भारताच्या व्यवसाय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्ती बनवले.

धीरूभाई अंबानी यांच्या यशाने आणि संपत्तीने त्यांना भारतातील सर्वात प्रभावशाली आणि वादग्रस्त व्यक्ती बनवले.

धीरुभाई अंबानी यांचा उद्योजकता प्रवास आणि भारतीय व्यावसायिक परिदृश्यातील त्यांचे योगदान सध्याच्या उद्योजकांना प्रेरणा देत आहे.

महत्वाच्या बातम्या:

आता तुमच्या घराजवळ होणार अंबानींचं दुकान, नेमका नवा प्लॅन काय?

 

[ad_2]

Related posts