IND Vs RSA : Ravichandran Ashwin Gives ‘Mankad’ Warning To Marco Jansen During IND Vs SA 1st Test

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs RSA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या मैदानात खेळवला जात आहे. सामन्यात सध्या दक्षिण आफ्रिकेने 163 धावांची आघाडी घेतली असून आजचा खेळ अजून संपलेला नाही. दरम्यान, ‘मंकड’ने (Mankad) च्या नियमांनुसार विरोधी खेळाडूंना बाद करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रविचंद्रन अश्निनने पुन्हा एकदा ही युक्ती वापरण्याचा प्रयत्न केलाय. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को जेन्सन जलद गतीने धावा काढण्यासाठी क्रिजच्या बाहेर पडला होता. त्यानंतर अश्विनने त्याला इशारा देऊन क्रिजच्या आत राहण्याचा इशारा दिला आहे. अश्विनने इशारा देताच मार्को जेन्सन माघारी परतला. 

98 व्या षटकात  ‘मंकड’ने बाद करण्याचा प्रयत्न (Mankad)

रविचंद्रन अश्विनने मार्को जेन्सला 98 व्या षटकात बाद करण्याचा प्रयत्न केला. अश्विन दरवेळीप्रमाणे चेंडू टाकत असताना थांबला आणि त्याने मंकडच्या नियमानुसार बाद करण्याचा प्रयत्न केला. अश्विनकडून मंकड करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी 2012 मध्ये श्रीलंकेच्या खेळाडूला अश्विनने अशाच प्रकारे बाद करण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय आयपीएलमध्ये जोस बटलरला त्याने याच नियमाने बाद करत तंबूत पाठवले होते. 2019 मध्ये जोस बटलर राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळत असताना अश्विनेने त्याला बाद केले होते. 

दक्षिण आफ्रिकेने घेतली मोठी आघाडी 

भारतीय संघाने (Team India) पहिल्या डावात सर्वबाद 245 धावा केल्या. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या आफ्रिकेने  मोठी आघाडी घेतलीये. सध्या आफ्रिकेकडे 163 धावांची आघाडी असून आजच्या दिवसातील खेळ आणखी सुरु आहे. आफ्रिकेकडून डीन एल्गर आणि मोर्को जेन्सनने दमदार कामगिरी केली आहे. डीन एल्गरने 287 चेंडूमध्ये 185 धावांची शतकी खेळी केली तर मार्को जेन्सन 87 धावा करत बाद झाला आहे. मार्को जेन्सन शिवाय डेव्हिड बेंडिमघमनेही अर्धशतकी खेळी केली. त्याने 87 चेंडूमध्ये 56 धावा केल्या आहेत. डीन एल्गर आणि मार्को जेन्सनच्या खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 408 धावा केल्या. 

‘मंकड’ काय आहे? (Mankad)

गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी नॉन स्ट्रायकर फलंदाजाने क्रीज सोडली आणि गोलंदाजाने धावचीत केल्यास याला मंकड म्हटले जाते. क्रिकेटच्या इतिहासात 1948 मध्येही या पद्धतीने फलंदाजाला बाद करण्याची नोंद आहे. भारतीय क्रिकेटपटू विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाज बिल ब्राऊन यांना अशाच प्रकारे धावचीत केले होते. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी या प्रकाराला ‘मंकड’ (Mankad) असे नाव दिले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या

India Vs South Africa : दक्षिण आफ्रिकेचा पहिला 408 धावांवर संपुष्टात; 163 धावांची महत्वपूर्ण आघाडी

[ad_2]

Related posts