[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अमरावती : मकर संक्रांत (Makar Sankranti 2024) म्हटली की, पतंग (Kite) उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पतंगसोबत लागणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी जीवघेणा ठरतो आहे. मकर संक्रात (Makar sankrant) सणाच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सवासाठी वापरण्यात येणारा नायलॉन (Naylon Manja) मांजाच्या वापरावर बंदी असून देखील त्याची छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होतांनाचे चित्र आहे. प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात राज्यभरात पोलिसांची जोरदार मोहिम राबविण्यात येत आहे. असाच प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अमरावतीच्या (Amravati) राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे. लाखों रुपयांचा मांजा जप्त केला आहे.
लाखोंच्या प्रतिबंधित मांजासह दोघांना अटक
मकर संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा हा नायलॉन आणि काचेच्या कोटिंगचा असतो. यामुळे पक्षी, प्राणी आणि नागरिक अनेकदा जखमी होतात. गेल्या काही वर्षात या नायलॉन मांजामुळे अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागला. या मांजाचा धोका लक्ष्यात घेता या नायलॉन मांजाची विक्री आणि खरेदीवर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी अनेक छुप्या मार्गाने हा मांजा विक्री होत असतो. मकर संक्रांतीला अवघे काही दिवस शिल्लक असतांना राज्यभरातील पोलीस सतर्क झाले आहे. अशीच एक गुप्त कारवाई आमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी राबावत छुप्या मार्गाने प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी या तरुणांकडून तीसहून आधिक मांजाचे बंडल जप्त करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली असून या तरूणांकडून आणखी मांजा मिळण्याची शक्यता असल्याने पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने घातक
मकर संक्रांतीसाठी वापरण्यात येणाऱ्या घातक मांजा मध्ये नायलॉन आणि काचेच्या कोटिंगचा वापर केला जातो. त्यामुळे या मांजाचे सहजा सहजी विघटन होत नाही. त्यामुळे मकर संक्रांत झाल्यानंतर देखील हा मांजा झाडांवर आणि इतरत्र तासांचं पडून राहतो. त्यामुळे अनेक पशू-पक्षी त्यामध्ये गुंतून त्यात त्यांचा मृत्यू होत. सोबतच यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत, तर कित्येकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. नायलॉन मांजामुळे विजेच्या तारांचे घर्शन होऊन आग लागून वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकारही घडतात. घरातील इलेक्ट्रिक उपकरणांनाही बाधा पोहोचते. नायलॉन मांजाचा वापर हा पर्यावरणाच्या दृष्टीने देखील घातक आहे. नायलॉन मांजा लवकर तुटत नाही. तसेच त्याचा नाशही होत नाही.
मकर संक्रांतीच्या तोंडावर कारवाई
प्राप्त माहितीनुसार शहरातील ठोक मांजा विक्रेते पावसाळ्यादरम्यान मांजा ऑर्डर करतात. त्यानंतर त्यांच्याकडून किरकोळ विक्रेते खरेदी करतात. तसेच त्यानंतर डिसेंबर महिन्यांपासून याची विक्री जोर धरत असते. मात्र पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका मकर संक्रांतीच्या तोंडावर कारवाई करतात. त्यामुळे ज्यांनी पूर्वीच मांजा विकला त्यावर नियंत्रण येत नाही. पोलिसांनी आपल्या नेटवर्कच्या सहाय्याने ठोक विक्रेत्यांवर नजर ठेवून मांजा शहरात दाखल होताच कारवाई केली तर असे प्रकार टाळता येईल. अशी भावना नागरिक व्यक्त करत आहे.
हे ही वाचा :
[ad_2]