Wrestling Federation Of India Office Has Been Removed From The Residence Of BJP MP Brij Bhushan Sharan Singh

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Wrestling Federation Of India Office : क्रीडा मंत्रालयाने गंभीर आक्षेप घेतल्यानंतर आज शुक्रवारी (29 डिसेंबर) भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या निवासस्थानातून (Brij Bhushan Sharan Singh)  कार्यालय हटवण्यात आलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका सूत्राने सांगितले की, “बृजभूषण सिंह यांचा परिसर रिकामा केल्यानंतर WFI नवी दिल्लीतील नवीन पत्त्यावरून काम करेल.” WFI चे नवीन कार्यालय नवी दिल्लीतील हरी नगर भागात आहे.

कारवाईमागे कार्यालय हे सुद्धा कारण 

24 डिसेंबर रोजी क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन केलेल्या WFI पॅनेलला निलंबित केले होते. संजय सिंह यांची WFI अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तीन दिवसांनी मंत्रालयाने हे पाऊल उचलले होते. बृजभूषण यांच्या निवासस्थानातून सुरू असलेलं कार्यालय हेही या कठोर कारवाईमागे एक कारण असल्याचे सांगण्यात आले होते. 

मंत्रालयाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, “फेडरेशनचे कामकाज माजी पदाधिकारी (बृजभूषण) यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या जागेतून चालवले जात आहे. हा देखील ते कथित परिसर आहे ज्यामध्ये खेळाडूंच्या लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत. सध्या न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत आहे. मंत्रालयाने असेही म्हटले होते की नवीन पॅनेल माजी (WFI) अधिकार्‍यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली काम करत आहे, जे राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या नियमानुसार नव्हते. 

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीगीरांचा विरोध

ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह अनेक अव्वल कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत आणि या प्रकरणाची दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी आणि विनेश यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर कारवाईची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतरवर अनेक दिवस आंदोलन केले होते.

21 डिसेंबर रोजी बृजभूषण यांच्या जवळचे मानले जाणारे संजय सिंह यांची WFI च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती, तर बजरंगने त्यांचे पद्मश्री परत केले आहे आणि विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप खासदार बृजभूषण यांच्या निकटवर्तीयाकडून महासंघ चालवू नये, असे या कुस्तीपटूंनी म्हटले आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने पुन्हा एकदा वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख भूपेंद्र सिंह बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts