Dhangar Reservation Meeting Pandharpur Solapur Give 5 Janaury Ultimatum To Eknath Shinde Maharashtra Govt Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोलापूर: राज्य सरकारने धनगर समाजाच्या (Dhangar Reservation) तोंडाला पाने पुसली आहेत, आता 25 जानेवारीपर्यंत जर धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधील प्रमाणपत्र नाही मिळले तर मात्र महाराष्ट्र धगधगेल असा अंतिम इशारा धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला. तर राज्य सरकार हे मराठा आणि धनगर समाजामध्ये भेदभाव करत असल्याचा आरोप सक्षणा सलगर यांनी केला. पंढरपूरमध्ये आज धनगर आरक्षण राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीकडे मात्र आमदार आणि खासदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे मोकळ्या खुर्च्यांमुळे बैठकीचा फ्लॉप शो झाल्याची चर्चा आहे. 

यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, या सरकारने आम्हाला फसवले असून आता त्यांना सत्तेबाहेर घालवण्याचे काम धनगर समाज करेल. यासाठी 15 जानेवारी रोजी पुणे येथे दुसरी राज्यव्यापी बैठक होऊन त्यात आंदोलनाची दिशा ठरवणे आणि गावोगावी समनव्यक नेमण्याचे काम होईल. 26 जानेवारीनंतर मात्र आता सरकारला सुट्टी दिली जाणार नसून पूर्ण महाराष्ट्र पेटवायचे काम धनगर समाज करेल. एकदा धनगर पेटला की समोरच्याला पेटविल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण महाराष्ट्र धगधगेल. 26 जानेवारीनंतर या आंदोलनाचा भडका उडालेला सरकारला पाहायला मिळणार असून याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल. आता सर्टिफिकेट नाही तर मतदान सुद्धा नाही हे या सरकारने ध्यानात घ्यावे.

मुख्यमंत्री दोन समाजामध्ये भेदभाव करत आहेत

धनगर समाजाच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या सक्षणा सलगर यांनी मुख्यमंत्री धनगर आणि मराठा या दोन समाजात भेदभाव करत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, स्वतः मराठा असल्याचे सांगणारे एकनाथ शिंदे हे मराठ्यांचे नाहीत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधील आरक्षणाचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारला 26 जानेवारीचा अल्टिमेटम देण्यात आला असून यानंतर धनगर समाज काय हे त्यांना कळेल अशा भाषेत राज्य सरकारला इशारा दिला. 

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दोन समाजात सुरु केलेला भेदभाव तात्काळ थांबवावा अन्यथा 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना सत्तेतून बाहेरचा रास्ता धनगर समाज दाखवेल असा इशाराही सलगर यांनी दिला. 

प्रमुख नेत्यांची बैठकीकडे पाठ

धनगर आरक्षणासाठी पंढरपुरातील आज झालेल्या राज्यव्यापी निर्णायक लढा बैठकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर, राम शिंदे, खासदार विकास महात्मे, राष्ट्रवादी आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह अनेक मुख्य नेत्यांनी पाठ फिरविल्याने सुरुवातीला जमा झालेली गर्दी दुपारीनंतर निघून गेली. त्यामुळे संपूर्ण मेळावा मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या घ्यावा लागला. या बैठकीला धनगर नेते प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, रामभाऊ वडकुते, यशपाल भिंगे, उत्तम जानकर, पांडुरंग मिरगळ, आदित्य फत्तेपूरकर अशी मोजकीच नेतेमंडळी उपस्थित होती. जसजशी भाषणे लांबू लागली तसतसे समाजातील पदाधिकारी उठून जाऊ लागल्याने या राज्यव्यापी बैठकीत काय फलित मिळाले हे सांगणे नेतेही टाळू लागले. 
      
सायंकाळी उशिरापर्यंत भाषणे सुरूच असल्याने या बैठकीच्या बाहेर आलेल्या सक्षणा सलगर यांनी बैठकीतील आपली भूमिका सांगितली. पक्षाचे जोडे बाहेर ठेवून आल्याचे प्रत्येक नेता सांगत असला तरी प्रत्येकजण आपल्या पक्षाच्या भूमिकेवरून आपली भूमिका मांडू लागल्याने सध्या राज्य सरकारला 26 जानेवारीचा अल्टिमेटम द्यायचा आणि तोपर्यंत आरक्षण देण्यासाठी दबाव आणायचा असे ठरले. बैठकीत अनेकांनी पाठ फिरविल्याचे निदर्शनास आणताच सलगर यांनी आमचा समाज गरीब असून लोक दूरदूरवरून आल्याने उशीर होऊ लागल्याने परत गेल्याचे सांगितले. 

आमच्या आंदोलनात कोणी साखर कारखानदार किंवा गुत्तेदार नसल्याचे सांगत त्यामुळे आमच्या बैठक क्रेन वगैरे वापरलेल्या हायफाय नसल्याचा टोला त्यांनी जरंगे यांच्या आंदोलनाला लगावला. धनगर आरक्षण एका सहीने देतो म्हणणारे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाताला आता लकवा मारला काय असा सवाल सलगर यांनी केला. जर 26 जानेवारी पर्यंत धनगर समाजाला न्याय नाही मिळाला तर धनगराची लाठी आणि काठी कशी असते ते सरकारला दाखवून देऊ असा इशाराही दिला.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts