[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maharashtra Politics: नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) गोटातून एक महत्त्वाची माहिती ‘एबीपी माझा’च्या हाती लागली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपावर काँग्रेसचा (Congress) फॉर्म्युला ठरला आहे का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. अशातच ‘एबीपी माझा’च्या हाती याचसंदर्भात एक्स्क्लुझिव्ह (ABP Majha Exclusive) माहिती लागली आहे. नवी दिल्लीतल्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. जागावाटप फॉर्म्युल्याची एक्स्क्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. दरम्यान, सध्या महाविकास आघाडीत जागावाटपावरुन धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सातत्यानं महाविकास आघाडीतील पक्षांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचं सत्र सातत्यानं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा जो काही प्रश्न असेल तो दिल्लीत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस हायकमांड घेईल, अशी माहिती महाविकास आघाडीतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी दिली होती. राज्यातल्या नेत्यांच्या त्यामध्ये सहभाग नसेल किंवा त्यावर त्यांचं कोणतंही मत नसेल, असंही महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या वतीनं सांगण्यात आलं होतं.
काँग्रेसचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?
22 जागा काँग्रेस
18 शिवसेना
06 राष्ट्रवादी काँग्रेस
अकोला, आणखी एक जागा अशा 2 जागा वंचित बहुजन आघाडीसाठी राखीव
[ad_2]