( प्रगत भारत । pragatbharat.com)
Budhaditya Rajyog In Makar: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात ग्रह त्यांच्या स्थितीमध्ये बदल करतात. याचप्रमाणे जानेवारीमध्ये अनेक ग्रह गोचर करणार असून त्यामुळे शुभ आणि राजयोग तयार होणार आहेत.
असंच आगामी नव्या वर्षात बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. बुध आणि सूर्य यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. हा राजयोग व्यक्तीला सन्मान, प्रतिष्ठा आणि संपत्ती प्रदान करतो. अशा स्थितीत या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं नशीब चमकणार आहे. जाणून घेऊया बुधादित्य राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे.
धनु रास (Dhanu Zodiac)
बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढणार आहे. यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळतील. तसेच यावेळी धनु राशीच्या लोकांचे दैनंदिन उत्पन्न वाढेल. ज्या लोकांचे काम आणि व्यवसाय परदेशाशी संबंधित आहेत त्यांना या काळात चांगले लाभ मिळू शकतात.
वृषभ रास (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अनुकूल ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीतून नवव्या भावात तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी नशीब तुम्हाला साथ देणार आहे. वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. जानेवारी महिन्यात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
मेष रास (Aries Zodiac)
बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकणार आहे. अपेक्षित पदोन्नती किंवा पगारात वाढ होऊ शकते. नवीन वर्षाचा पहिला महिना नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी चांगली बातमी घेऊन येणार आहे. नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी बॉस तुमची प्रशंसा करू शकतात.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )