Sand Depo Opened At Mangrul Dastgir In Amravati It Was First Sand Depo At West Vidarbha Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अमरावती : राज्यातील सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू (Sand) उपलब्ध करून देण्याच्या धोरणात्मक निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला होता. ज्यामध्ये या नव्या धोरणानुसार 600 रुपये ब्रासप्रमाणे रेती उपलब्ध करून दिली जात असल्याचे दावे प्रशासनाकडून करण्यात आले. मात्र असे असले तरी घोषणा झल्यानंतर देखील जिल्‍ह्यात स्‍वस्‍त दरात वाळू उपलब्‍ध होऊ शकली नाही. दरम्यान, अवैध पद्धतीने छुप्या मार्गने रेतीसह इतर गौण खनिजांच्या तस्करीचे प्रमाण वाढले. यांच पार्श्वभूमीवर आता पश्चिम विदर्भातील (West  Vidarbha) पहिला वाळू डेपो  अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर येथे सुरू करण्यात आला आहे. नुकताच मंगरूळ दस्तगीर येथील वाळू डेपोचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना अगदी माफक दरात वाळू उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पश्चिम विदर्भातील पहिला वाळूचा डेपो

अमरावती जिल्ह्यात आता वाळूचा प्रश्न मार्गी लागला आहे. कारण अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ येथे सुरू करण्यात आलेला वाळूचा डेपो हा पश्चिम विदर्भातील पहिला वाळूचा डेपो ठरला आहे. त्यामुळे अवैध पद्धतीने होणाऱ्या वाळूच्या तस्करी आणि त्यातून सर्वसामान्यांना मोजावे लागणाऱ्या ज्यादा पैसे, अशा प्रकारांना आळा बसणार आहे. या वाळू डेपोमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये या निर्णयानुसार प्रती ब्रास 600 रुपये दराने वाळू उपलब्ध होणार आहे. नुकतेच मंगरूळ दस्तगीर येथील वाळू डेपोचे उद्घाटन करण्यात आले असून जिल्हयातील नागरिकांना ही या मुळे दिलासा मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे घरकुल लाभार्थ्यांना या डेपोच्या माध्यमातून पाच ब्रास रेती मोफत मिळणार आहे.

 600 रुपये ब्रास प्रमाणे मिळणार वाळू

गेल्या महाराष्ट्र दिनी वाळूच्या अवैध वाहतुकीसह तस्कारीला आळा घालण्यासाठी सरकारने नव्या वाळू धोरणाची घोषणा करत, थेट 600 रुपये ब्रास प्रमाणे वाळू अधिकृत डेपोवरून विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सर्व राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या होत्या. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या घोषणेनंतर सर्वत्र या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली. असे असले तरी बहुतांश भागात अद्याप रेती डेपो सुरू न झाल्याचे चित्र आहे. अमरावती जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या एकूण 44 वाळूघाटांच्‍या 14 वाळू डेपोंसाठी ई-निविदा पद्धतीने निविदा मागविण्यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत गेल्‍या 23 ऑक्टोबरला सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 14 वाळू डेपोंपैकी जळगाव मंगरुळ (ता. धामणगाव रेल्वे), चांदूर ढोरे (ता. तिवसा) आणि तलई (ता. धारणी) येथे तीन किंवा त्यापेक्षा जास्त निविदा प्राप्त झालेल्या होत्या. मात्र उर्वरित 11 वाळू डेपोंसाठी तीन किंवा त्यापेक्षा जास्त निविदा प्राप्त झाल्या नव्हत्या. तीन वाळू डेपोंच्‍या व्‍यतिरिक्‍त इतर 11 वाळू डेपोंसाठी ई-निविदेला 8 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. मात्र अजून देखील हा प्रश्न निकाली लागला नाही.   

इतर महत्वाची बातमी : 

[ad_2]

Related posts