Gondia Police Seized Large Quantity Of Liquor Along With Liquor Seller Before Thirty First Big Operation By Police Crime News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

गोंदिया : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे (New Year Celebration) उत्साहात स्वागत करण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर अवैध पद्धतीने अमली पदार्थ आणि बनावटी दारू (Alcohol) विक्रीच्या प्रकारांवर पोलीस यंत्रणा कटाक्षाने नजर ठेऊन असतात. अवैध पद्धतीने दारू विक्री (Alcohol) करणाऱ्या दारू विक्रेत्यांवर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत मोठा दारूचा साठा जप्त केला. 80 हजार रुपयांची देशी-विदेशी दारू (Gondia Crime News) जप्त करत या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

दारू विक्रेत्यासह मोठ्या प्रमाणात दारूसठा जप्त  

नवीन वर्षाची सगळ्यांना चाहुल लागली असताना गोंदियात 31 डिसेंबरच्या आदल्याच दिवशी गोंदिया पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. उद्या वर्षाचा शेवटचा दिवस असून त्याच्या पूर्वसंध्येलाच गोंदिया पोलिसांच्या वतीने अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईच्या सपाटा सुरू करण्यात आला आहे. या अनुषंगाने गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अदासी येथील सुजीत डोंगरे अवैध पद्धतीने दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून जवळ जवळ 20 प्रकारच्या वेगवेगळ्या कंपनीची दारू जप्त केली आहे. ज्याची किंमत 80 हजार रुपये इतकी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात अवैध धंद्यांच्या विरोधात गोंदिया पोलीस ॲक्शन मोडवर आली असून यामुळे अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री

‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत असते. विशेष म्हणजे आठवडाभरा पूर्वीच यासाठी दारूसाठा आणून ठेवला जातो. देशी दारूपासून तर विदेशी दारूपर्यंत सर्वच दारूंची अवैध विक्री होते. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष पथक यासाठी नियुक्त देखील केले जातात. या पथकाकडून कारवाई देखील होते. मात्र, असे असलं तरीही चोरट्या मार्गाने ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री होत असल्याचे चित्र पाहायला मिळतेच.

किती मद्य विक्री ?

आकडेवारीनुसार, एप्रिल 2022 ते मार्च 2023 दरम्यान, देशभरात 39.5 कोटी मद्याच्या बॉक्सची विक्री झाली. विक्रीचा हा आकडा त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 12 टक्के अधिक आहे. चार वर्षांपूर्वी सर्वाधिक मद्य विक्री नोंदवण्यात आली होती. वर्ष 2018-19 मध्ये जवळपास 35 कोटी बॉक्सची विक्री झाली होती. मागील आर्थिक वर्षात तळीरामांनी 4 कोटी बॉक्सची खरेदी केली. 

मागील आर्थिक वर्षात किमतीत वाढ 

गेल्या आर्थिक वर्षात जवळपास सर्वच कंपन्यांनी दारूच्या किमती वाढवल्या आहेत. प्रमुख मद्य कंपनी Pernod Ricard  एका अधिकाऱ्याने गेल्या महिन्यात सांगितले की, 2022-23 मध्ये भारतात ज्या प्रकारे किंमती वाढल्या होत्या. त्यानंतरही ग्राहकांचा विश्वास कायम आहे. तसेच आगामी काळाबाबत त्यांनी भारतीय बाजाराकडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या. ही कंपनी भारतात एंट्री लेव्हलवर रॉयल स्टॅग व्हिस्की, प्रीमियम सेगमेंटमध्ये बॅलेंटाइन, चिव्हास रीगल आणि द ग्लेनलिव्हेट सारखे ब्रँड आणि व्होडका सेगमेंटमध्ये अॅबसोल्युट ब्रँडच्या मद्याची विक्री करते. 

हे ही वाचा :    

 

[ad_2]

Related posts