Finance Minister Sitharaman Statistics How Much Profit Did Public Sector Banks Earn In The First 6 Months Of The Current Financial Year

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nirmala sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी काल ( शनिवार 30 डिसेंबर) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (Public Sector Banks) कामकाजाचा आढावा घेतला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी PSB प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरकारी बँकांना आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सुमारे 68,500 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. यापूर्वी 2022-23 या आर्थिक वर्षात बँकांच्या ताळेबंदातही चांगली वाढ दिसून आली होती.

या मुद्द्यांवर बैठकीत झाली चर्चा 

कालच्या बैठकीत सायबर सुरक्षा आणि आर्थिक क्षेत्राला असलेल्या धोक्यांशी संबंधित मुद्दे उपस्थित करण्यात आले. या सर्व मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्ज वाटप करण्यापूर्वी योग्य परिश्रम, मोठ्या कर्ज खात्यांची थकबाकी आणि त्यामुळं होणारा परिणाम यावरही चर्चा केली.

डिफॉल्ट नियंत्रित कसे करायचे? 

अर्थमंत्र्यांनी सरकारी बँकांना मोठ्या कर्ज खात्यांवर योग्य प्रकारे लक्ष ठेवण्यास सांगितले. अशा कर्ज खात्यात थकबाकी असल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करा असेही सांगितले आहे. सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना कर्ज वाटप करण्यापूर्वी योग्य परिश्रम घेण्याचे आणि जबाबदार कर्ज वितरण पद्धतींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

सायबर सुरक्षेबाबत केल्या सूचना

या बैठकीत सरकारी बँकांना सायबर सुरक्षेबाबत महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जेणेकरून देशांतर्गत बँकिंग प्रणालीवर कोणत्याही परिस्थितीत परिणाम होऊ नये. अर्थमंत्र्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सक्रिय सायबर सुरक्षा उपायांचा अवलंब करण्यास आणि देशांतर्गत वित्तीय प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले. दरम्यान, या बैठकीनंतर असे सांगण्यात आले की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सुमारे 68,500 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. यापूर्वी 2022-23 या आर्थिक वर्षात बँकांच्या ताळेबंदात चांगली वाढ दिसून आली होती.

बँकांच्या मालमत्तेची गुणवत्ता सतत सुधारत आहे. मार्च 2023 पर्यंत सर्व अनुसूचित व्यावसायिक बँकांचे एकूण NPA (nonperforming asset) 3.9 टक्क्यांवर आले होते. सप्टेंबर 2023 पर्यंत ते आणखी कमी होऊन 3.2 टक्के होईल असे सांगण्यात आले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

FD ग्राहकांना नवीन वर्षापूर्वी मिळालं मोठं गिफ्ट भेट, ‘या’ बँकांनी वाढवले व्याजदर 

[ad_2]

Related posts