Phone 15 And MacBook Will Be Available At The Lowest Price So Far Apple Days Sale Will Begin Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : सध्या आयफोन वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत चाललीये. त्यातच अॅपलकडून (Apple) नुकताच आयफोन 15 (Iphone 15) लॉन्च करण्यात आलाय. हा आयफोन घेण्यसाठी देखील अनेकांनी पसंती दर्शवल्याचं पाहायला मिळालं. पण ज्यांनी हा आयफोन 15 अजून घेतला नाहीये, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय. विजय सेल्समध्ये 31 डिसेंबर 2023 पासून अॅप्‍पल डेज सेलला सुरुवात झालीये. यामध्ये नवीन आयफोन 15 हा 66,990 रुपयांच्या किंमतीत मिळणार आहे. तसेच आयफोन 15 प्लसची किंमत ही 75,820 रुपये इतकी असणार आहे. 

या अॅपल डेज सेलमध्ये अनेक आकर्षक डिल्‍स ग्राहकांना मिळणार आहे.तसेच विजय सेल्‍सच्‍या 130 पेक्षा अधिक रिटेल आऊट्लेट्सच्‍या व्‍यापक नेटवर्कमध्‍ये त्याचप्रमाणे त्यांच्या वेबसाईटवरही तुमच्या आवडत्या अॅपल डिवाईसवरील अनेक सूट मिळवण्याच्या संधीचा आनंद घेऊ शकता. हा सेल 7 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे. दरम्यान या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डवर जवळपास 4000 रुपयांच्या त्वरित सूटचा पर्याय देखील देण्यात आलाय. 

आयफोन प्रोवर देखील भन्नाट ऑफर्स

दरम्यान आयफोन 15 प्रो व्हर्जन देखील भन्नाट ऑफर्स येणार आहेत.  आयफोन 15 प्रो 1,22,900 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच आयफोन 15 प्रो मॅक्सची किंमत 1,46,240 रुपये इतकी असणार आहे. त्याचप्रमाणे एचडीएफसी बँकेच्या कार्डवरही जवळपास 3000 रुपयांची त्वरित सूट देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलीये. आयफोन 13 देखील 50,820 रुपयांच्या किंमतींमध्ये उपलब्ध होणार असून त्यावर देखील एचडीएफसी बँकेच्या कार्डवर जवळपास 1000 रुपयांची त्वरित सूट देण्यात येणार आहे. 

आयपॅडवर आहेत ‘या’ ऑफर्स

आयपॅड नाइन्‍थ जनरेशन हा 27,900 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होणार आहे. तसेच आयपॅड टेन्‍थ जनरेशन हा 33,430 रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. आयपॅड एअर फिफ्थ जनरेशनची किंमत  50,680 रुपये इतकी असणार आहे. तसेच आयपॅड प्रोची किंमत 79,900 रुपयांपासून सुरु होणार आहे.  या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास 5000 रुपयांची डिसकाऊंट देखील मिळणार आहे. 

मॅकबुकवरही ऑफर्स

एम3 चिपसह मॅकबुक प्रो हा 1,47,270 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे एम3 प्रो चिपसह मॅकबुक प्रो 1,74,910 रुपयांपासून उपलब्ध होणार आहे. एम3 मॅक्‍स चिपसह मॅकबुक प्रो 2,82,910 रूपयांपासून उपलब्‍ध असेल. एम२ चिप असलेला मॅकबुक प्रो 1,10,270 रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल. या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास 5000 रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

iPhone 14 च्या 128GB व्हेरिएंटवर मिळते भरघोस सूट; आता ‘इतक्या’ किंमतीत खरेदी करू शकता तुमचा आवडता फोन

[ad_2]

Related posts