Invetment Plan Invest Rs 100 Daily Get Fund Of Rs 4 Crore 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Invetment Plan : तुमच्या करिअरमध्ये लवकर गुंतवणूक (Invetment) सुरू करणे ही चांगली सवय आहे. जितक्या लवकर तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन सुरू कराल तितक्या लवकर तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य कराल. मार्केट लिंक्ड रिटर्न्स नवीन वयोगटातील गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. कारण ते व्याज दर निश्चित केलेल्या हमीपरताव्याच्या गुंतवणुकीच्या तुलनेत चांगला परतावा देतात. गेल्या पाच वर्षांत म्युच्युअल फंड गुंतवणूक हा लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणून उदयास आला आहे. जर तुम्हाला एसआयपीद्वारे (SIP) पैसे कमवायचे असतील तर दीर्घकालीन धोरण हा सर्वोत्तम मार्ग आहे. दररोज जर तुम्ही 100 रुपये गुंतवूणूक केली तर काही वर्षातच तुम्ही 4 कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता. 

तुम्ही दीर्घ कालावधीसाठी SIP द्वारे गुंतवणूक केल्यास, तुम्हाला मिळणारा परतावा तुमच्या मूळ रकमेपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. आज आम्ही तुम्हाला रोज 100 रुपयांची गुंतवणूक करुन यातून 4 कोटी रुपयांचा निधी कसा तयार करायचा ते सांगणार आहोत.

काय आहे SIP चे  गुंतवणूक सूत्र

तुम्हाला जर लक्षाधीश व्हायचे असेल तर म्युच्युअल फंडात 30 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. त्यावर तुम्हाला जर अंदाजे 15 टक्के परतावा मिळाला तर मोठी रक्कम बचत होऊल. सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ, याचा अर्थ, प्रत्येक गुंतवणुकीच्या चक्राच्या शेवटी, तुमची एकूण रक्कम, परताव्यासह, तुमची मुद्दल बनते. मूळ रक्कम दरवर्षी बदलत असल्यानं, दरवर्षी 15 टक्के परतावा तुम्हाला मोठा निधी तयार करण्यास मदत करू शकतो. येथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे अचूक एसआयपी फॉर्म्युला जाणून घेणे, जे एसआयपीमध्ये मूल्य वाढवेल. हे सूत्र स्टेप अप एसआयपी म्हणून ओळखले जाते. तुम्हाला दरवर्षी 10 टक्के स्टेप-अप रेट राखावा लागेल.

तुम्ही 30 वर्षांचे आहात. दररोज 100 रुपये वाचवा आणि SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा.

30 वर्षांचे लक्ष्य गुंतवणुकीचे धोरण ठेवा. दरवर्षी 10 टक्के स्टेप-अप करत रहा.

जर तुम्ही 3000 रुपयांपासून सुरुवात केली तर पुढच्या वर्षी तुम्हाला 300 रुपयांनी वाढवावी लागेल.

30 वर्षांनंतर तुमची मॅच्युरिटी रक्कम 4,17,63,700 रुपये (4.17 कोटी) होईल.

SIP कॅल्क्युलेटरनुसार, 30 वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक रु 59,21,785 (रु. 59.22 लाख) असेल.

येथे 3 कोटी 58 लाख 41 हजार 915 रुपयांचा भांडवली नफा होणार आहे.

SIP मधील परताव्याची ही जादू आहे. अशाप्रकारे, स्टेप-अप फॉर्म्युलाच्या मदतीने तुमच्याकडे 4 कोटी 17 लाख रुपयांचा मोठा निधी जमा होईल.

महत्त्वाच्या बातम्या:

करोडपती व्हायचंय? दरमहा करा फक्त 10 हजारांची गुंतवणूक, काही वर्षातच मिळतील 1.5 कोटी 

[ad_2]

Related posts