केईएममध्ये हिमोफिलिया रुग्णांना एकाच छताखाली उपचार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

रुग्णालयामध्ये हिमोफिलियावरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता हिमोफिलियाच्या रुग्णांची धावपळ थांबणार आहे. 

हिमोफिलियाच्या रुग्णांना विविध चाचण्यांसाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये फिरावे लागते. त्यामुळे त्यांना होणारा त्रास लक्षात घेत केईएम रुग्णालय हिमोफिलियाच्या रुग्णांना एकाच छताखाली, एकाच ठिकाणी उपचार आणि निदान उपलब्ध करून देत आहे.

केईएम रुग्णालयात दर बुधवारी सकाळी ११ ते १ या वेळेत बहुविद्याशाखीय हिमोफिलिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

माणसाच्या शरीरात रक्त गोठवण्यासाठी फॅक्टर ८ आणि फॅक्टर ९ हे घटक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. मात्र हिमोफिलियाग्रस्तांमध्ये हे दोन्ही घटक नसल्याने त्यांच्या शरीराअंतर्गत तीव्र रक्तस्त्राव होऊन सांधे, मेंदू, स्नायूंमध्ये जखमा होतात. यामुळे रुग्णाला प्रचंड त्रासाला तोंड द्यावे लागते.

हिमोफिलिया हा आनुवंशिक आजार आहे. ६० टक्के रुग्ण हे अनुवांशिक, तर ४० टक्के रुग्णांमध्ये हा आजार अन्य कारणांमुळे उद्बवतो.

रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या या रुग्णांना तपासण्यासाठी विविध ठिकाणी फिरावे लागते. त्यामुळे त्यांना होणार त्रास लक्षात घेऊन केईएम रुग्णालयात दर बुधवारी सकाळी ११ ते १ या वेळेत बहुविद्याशाखीय हिमोफिलिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामुळे रुग्णाला एका ठिकाणी मार्गदर्शन मिळाल्यास रुग्णावर पुढील उपचार करणे सोपे होईल.

केईएममध्ये बाह्यरुग्ण विभागात प्रत्येक महिन्यात सरासरी ३०० रुग्ण दाखल होतात. यामध्ये महाराष्ट्रासह बिहार, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश आणि चंदीगढ या राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी लाखो रुपये खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसतो.

मात्र, केईएम रुग्णालयामध्ये हे उपचार मोफत केले जातात. केईएम रुग्णालयात हिमोफिलिया रुग्णांसाठी फिजीओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑर्थोपेडिक सर्जन, हिमेटॉलॉजिस्ट, दंत, जनरल सर्जन, प्रयोगशाळा अधिकाऱ्यांच्या तुकड्या कार्यरत आहेत.


हेही वाचा

महाराष्ट्र: 5 जिल्ह्यांमध्ये मलेरियाच्या शून्य रुग्णांची नोंद

टाटा रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांवर प्रोटॉन उपचार

[ad_2]

Related posts