Amol Kolhe Slams BJP Government Ajit Pawar Kokan Submarine Project Will Go To Gujarat

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. मात्र राज्यातील कोणताही प्रकल्प बाहेर गेला नाही, विरोधक निवडणुकीच्या तोंडावर कोणताही मुद्दा नसल्याने हा मुद्दा काढत आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केला.  तर केंद्र सरकारला आमच्या हक्काचं हिसकावून घेऊ नका हे सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नसल्याची टीका खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) केलीय.  ते पुण्यात बोलत होते. 

अजित पवार म्हणाले, राज्यातून काही उद्योग उद्योग बाहेर गेलेले नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर काही मुद्दे नाहीत म्हणून असे मुद्दे काढण्यात येतात.  कालच मी मुख्यमंत्र्यांचे निवेदन ऐकले. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे राज्यातून एकही उद्योग बाहेर गेलेला नाही.

केंद्र सरकारला आमच्या हक्काचं हिसकावून घेऊ नका हे सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नाही : अमोल कोल्हे

एकीकडे एक चित्र दाखवायचे आणि दुसरीकडे वस्तुस्थिती मात्र वेगळी असते. परंतु महाराष्ट्र सरकार हे केंद्र सरकारला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या हक्काचं हिसकावून घेऊ नका हे सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. तशी परिस्थिती सध्या राज्यात नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले. 

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार : अमोल कोल्हे

अमोल कोल्हे म्हणले, दादा मोठे नेते आहेत. माझ्यासारखा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला नेता त्यांच्यासमोर लहान आहे. मायबाप जनता माझ्या कामांची पोचपावती देईल. माझ्यासमोर जे कोणी असेल त्यांच्यासमोर मी माझे विचार घेऊन जाईल. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल. 

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा : अमोल कोल्हे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणार आहेत.  त्यांचे मनापासून स्वागत करतो.  जो शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला या आक्रोश मोर्चाचा आवाज हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे.  मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा जर शासकीय कार्यक्रम असतात तर मला वाटतं जास्त आनंद झाला असता शेतकऱ्यांच्या समस्या जास्त तातडीने सोडवण्यासाठी याचा याची मदत झाली.

महाराष्ट्रामध्ये जास्त प्रकल्प आले पाहिजे : अशोक चव्हाण

सिंधुदुर्ग किनाऱ्यावर (Sindhudurg) होणारा पाणबुडी प्रकल्प (Submarine Project) गुजरातला जाणार  यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, सत्ताधारी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री आहे. त्यांनी विचार केला पाहिजे.  गुजरातला अधिक प्रकल्प चालले आहे. महाराष्ट्रामध्ये जास्त प्रकल्प आले पाहिजे.

हे ही वाचा :

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा, मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या भाजप तयारीत

[ad_2]

Related posts