[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
बिहार : अयोध्येत राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनासाठी जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे विश्व हिंदू परिषदेकडून (Vishwa Hindu Parishad) राम मंदिराच्या उद्घाटनासाठी निमंत्रण पत्रिकेचे वाटप सुरु आहे. तर दुसरीकडे राम मंदिराच्या मुद्यावरुन राजकारण चांगलंच तापलंय. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव (Lalu Yadav) आणि राबडी देवी (Rabadi Devi) यांच्या निवासस्थानाबाहेर मंदिराबाबत पोस्टरबाजी करण्यात आलीये. “मंदिर म्हणजे मानसिक गुलामीचा मार्ग”, असा दावा या पोस्टरवर करण्यात आलाय.
पोस्टरवर काय लिहिण्यात आलंय?
“मंदिर म्हणजे मानसिक गुलामीचा मार्ग आहे. शाळा म्हणजे जीवन प्रकाशमय करण्याचा मार्ग आहे. मंदिरातील घंटी वाजली की, अंधश्रद्धा, अज्ञानतेकडे आपण जात असल्याचा संदेश दिला जातो. तर शाळेची घंटी वाजली की, आपण वैज्ञानिकता, तर्क लावण्याच्या क्षमतेकडे जात असल्याचा संदेश मिळतो -सावित्रीबाई फुले” आता तुम्हीच ठरवा तुम्हाला कोणत्या दिशेने जायचे आहे, असा आशय या पोस्टरवर लिहिण्यात आलाय. राष्ट्रीय जनता दलाचे आमदार फतेह बहादूर यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर सध्या करण्यात आलेल्या पोस्टरवरतीही फतेह बहादूर यांचा फोटो लावण्यात आलाय.
पोस्टरवर काय आहे?
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव (Lalu Yadav) आणि त्यांच्या पत्नी यांच्या निवासस्थानाबाहेर अनेक पोस्टर लगावण्यात आले आहेत. यामधील एका पोस्टरवर मंदिर आणि शाळा यांच्यामध्ये तुलना करण्यात आली आहे. या पोस्टरवर एकीकडे लालू यादव आणि राबडी देवी यांचा फोटो आहे, तर दुसरीकडे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचाही फोटो लावण्यात आलाय. शिवाय, पोस्टरच्या वरिल बाजूस गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar), पेरियार आणि सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा फोटो लावण्यात आलाय.
राम मंदिराच्या निमंत्रण पत्रिका वाटण्याचे काम सुरुच
राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणासाठी पत्रिका वाटण्याचे काम सुरु करण्यात आलंय. 22 जानेवारी रोजी रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निमंत्रण पत्रिका वाटण्याचे काम सुरु केलंय. देशभरातील 5 लाख गावांमध्ये निमंत्रण पत्रिका पोहोचवण्याचे टारगेट विश्व हिंदू परिषदेने ठेवलंय. या पत्रिकेच्या माध्यमातून राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलंय.
इतर महत्वाच्या बातम्या
Congress Plan For Loksabha Election : मित्र पक्षांना न दुखावता लोकसभेसाठी काँग्रेसकडून एकाचवेळी दोन मेगा प्लॅन तयार; काय आहे रणनीती?
[ad_2]