[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : शिवडी न्हावाशेवा सागरी सेतुचे (Trans Harbour Link) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येतेय. तसेच शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू हा 12 जानेवारीपासून सेवेत आणण्यासाठी राज्यसरकरच्या हालचाली सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 जानेवारीला नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. याच वेळी मुंबई न्हावाशोवा सागरी सेतूचं उद्घाटन करण्यासाठी राज्य सरकारची तयारी सुरु झालीये.
देशातील सर्वात लांब समुद्री पूल अर्थातच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आहे. या ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करता येणं शक्य होणार आहे. हा मार्ग 22 किमी लांबीचा असून जवळपास 18 किमी समुद्रातून आहे. त्याचप्रमाणे इतर पावणे चार किमीचा मार्ग हा जमिनीवरील आहे. मुंबईतल्या शिवडीतून नवी मुंबईचे अंतर आता अवघ्या 20 मिनिटांत कापता येईल. दुसरीकडे हा मार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला देखील जोडला जातोय. त्यामुळे मुंबई-पुणे अंतर देखील या मार्गामुळे कमी होण्यास मदत होईल.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाला विशेष महत्त्व
अवघ्या काही महिन्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात तयारी देखील सुरु करण्यात आलीये. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकामुळे या उद्घाटनाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचं म्हटलं जातंय. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा सागरी सेतू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं म्हटलं जात आहे.
समुद्री वाहतुकीस अडथळा होणार नाही यासाठी नेव्हिगेशनल स्पॅनची उभारणी
मुख्य पुलाची रचना ही 60 मीटर लांबीच्या स्पॅनची असून मुख्यतः ते सेगमेंटल बॉक्स गर्डर व कॉक्रिट डेक आहेत. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे एक प्रमुख वैशिष्ट्य असलेला हा सागरी क्षेत्रातील नॅव्हिगेशन भागातील स्टील डेक आहे. ज्याला तांत्रिकदृष्ट्या ऑर्थोोट्रॉपिक स्टील डेक (OSD) असे म्हणतात. समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे हे स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे २५ मीटर उंच बांधण्यात येत आहेत. त्यामुळे हा स्पॅन नेव्हिगेशनल स्पॅन म्हणून ओळखला जातो.
मुंबई ते अलिबाग हे अंतर या सागरी महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. पर्यावरणपूरक असा हा सागरी महामार्ग असून बांधकामातील जागतीक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून त्याचे काम करण्यात आले आहे. ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग ठरणार असल्याचेही सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा :
1826 पानांचे पुरावे देऊनही अब्दुल सत्तारांवर कारवाई होईना, तक्रारदराने थेट ईडी कार्यालयासमोरच कापला केक
[ad_2]