India Lists Canada Based Goldy Brar As A Terrorist Under The Unlawful Activities Prevention Act 1967

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Goldy Brar Declared As Terrorist : केंद्र सरकारने आज सोमवारी (1 जानेवारी) गँगस्टर गोल्डी ब्रारला UAPA कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केलं आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये गोल्डी ब्रार प्रतिबंधित खलिस्तानी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की गोल्डी ब्रारला सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी संघटनांचा पाठिंबा आहे आणि अनेक हत्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. ब्रार हा नेत्यांना धमकीचे फोन करणे, खंडणी मागणे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हत्येचे दावे पोस्ट करणे यात सामील होता, असे या नोटिशीत म्हटले आहे.

गोल्डी ब्रार हा शस्त्रास्त्रांच्या तस्करीत सहभागी 

सीमेपलीकडून ड्रोनद्वारे आधुनिक शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटक सामग्रीच्या तस्करीमध्ये गोल्डी ब्रारचा हात असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. खून करण्यासाठी तो शार्प शूटर्सना ही शस्त्रे पुरवत होता. 

‘देशविरोधी कारवायांचे षड्यंत्र रचले’

तो आणि त्याचे सहकारी पंजाबमध्ये तोडफोड करणे, दहशतवादी मॉड्यूल तयार करणे, लक्ष्यित हत्या (टार्गेट किलिंग) करणे आणि अशांतता, जातीय सलोखा, कायदा आणि सुव्यवस्था आणि देशविरोधी कारवाया निर्माण करण्याचा कट रचण्यात गुंतले होता.

सिद्धू मूसवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली

कॅनडास्थित या दहशतवाद्याने 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येची जबाबदारीही स्वीकारली होती. मे 2022 मध्ये पंजाबमधील मानसा जिल्ह्यात मूसवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर काही दिवसांनी इंटरपोलने जून 2022 मध्ये गोल्डी ब्रारच्या प्रत्यार्पणासाठी रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी केली होती.

सिद्धू मूसवालाच्या हत्येचा कट रचला

मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टरमधून दहशतवादी घोषित झालेला गोल्डी ब्रार हा पंजाबच्या श्री मुक्तसर साहेबाचा रहिवासी आहे. त्याचा जन्म 11 एप्रिल 1994 रोजी झाला. सध्या ब्रॅम्प्टन, कॅनडा येथे राहतो. तिथे खलिस्तानी दहशतवाद्यांशी संगनमत करून भारताविरुद्ध काम करत आहेत. कॅनडामध्ये बसून त्याने पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येचा संपूर्ण कट रचला होता. यानंतर सोशल मीडियावर घोषणा करून याची जबाबदारीही स्वीकारली होती.

टोळ्यांच्या दीर्घ तपासानंतर यादी तयार

केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने परदेशातून चालवल्या जाणाऱ्या टोळ्यांच्या दीर्घ तपासानंतर यादी तयार केली आहे. यामध्ये देशाच्या सुरक्षेला धोका असलेल्या सुमारे 28 मोठ्या कुख्यात गुंडांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ही यादी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे. हे गुंड पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थानसह अनेक राज्यांत मोठमोठे गुन्हे घडवत आहेत. एवढेच नाही तर ते देशविरोधी कारवायांमध्येही सहभागी आहेत.

गँगस्टर लखबीर सिंग लांडा सुद्धा दहशतवादी घोषित

काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने आणखी एक गँगस्टर लखबीर सिंग लांडा यालाही दहशतवादी घोषित केले होते, ज्याचा बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे आढळून आले होते. गोल्डी ब्रारचे त्याच्याशी थेट संबंध आहेत. लखबीर सिंग लांडा हा पाकिस्तानात राहणारा खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा याच्यासोबत काम करतो. पंजाबमधील मोहाली आणि तरनतारन येथे रॉकेट हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी त्याच्यावर 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 2022 मध्ये त्याने मोहालीमधील पंजाब पोलिस मुख्यालय आणि तरनतारनमधील सरहाली पोलिस स्टेशनवर रॉकेटने हल्ला केला होता. सध्या तो कॅनडातील अल्बर्टा येथे राहतो.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts