[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune crime news : पुण्यातील जिल्हाधिकारी यांचं बनावट (Pune crime news) फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यावरुन अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंर आता पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांचंदेखील बनावट फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांच्या रडारावर आता सामान्य जनताच नाही तर वरिष्ठ अधिकरी असल्याचं चित्र आहे. त्यांचा बनावट फेसबुक अकाऊंटवरुन मेसेज करुन फर्निचर विकण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

’कोणीतरी माझे फेक फेसबुक अकाऊंट उघडून माझ्या लिस्टमधील अनेकांना रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मेसेंजरवर संवाद साधत आहे. फर्निचर विकण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रयत्नात आहे. "माझे अन्य कोणतेही फेसबुक खाते नाही. कोणीही संतोषकुमार नावाचा CRPF मधील अधिकारी माझ्या परिचयाचा देखील नाही. या फेक अकाऊंटबाबत मी फेसबुकवर रिपोर्ट केला आहे. तसेच सायबर क्राईमच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे. माझ्या मित्रांना विनंती आहे की त्यांनी या प्रकाराला फसू नये आणि कोणताही आर्थिक व्यवहार करु नये," असं आवाहन त्यांनी केलं आहे.

कशी केली जाते फसवणूक?

-जगताप यांच्या बनावट फेसबूक अकाऊंटवरुन अनेकांना मेसेज केले जातात.
-संतोषकुमार नावाचा CRPF मधील अधिकारी याच्या घरातील फर्निचर विकायचं आहे, असं सांगितलं जातं.
-त्या मेसेजमध्ये ‘मी मीटिंगमध्ये आहे. मला फोनवर बोलता येत नाही. दिलेल्या नंबरवर 50 हजार रुपये पाठवा’ असं लिहिलं आहे.
-त्यासोबतच काही नंबरदेखील दिलेले आहेत.
-CRPF च्या ट्रकमधून तुम्हाला फर्निचरची होम डिलिव्हरी होणार असल्याचं सांगतात.
-6370422750, 8984388590, 9438435903, 7601987390 या नंबरवरुन फोन येतो आणि पैसे पाठवण्यासाठी सांगतात.

तीन मित्रांची फसवणूक, अनेकांना मेसेज केल्याचा अंदाज

आतापर्यंत जगताप यांच्या अनेक मित्रांना अशा प्रकारचे मेसेज आले आहेत. त्यापैकी काही जणांनी पैसेदेखील भरले आहे. त्यातील तिघांना फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र यात अनेक लोकांची फसवणूक झाल्याचा अंदाज जगताप यांनी व्यक्त केला आहे.

अधिकारी सायबर चोरांच्या रडारवर?

दोन दिवसांपूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट काढण्यात आलं होत. आतापर्यंत त्यांचे तीन ते चार वेळा बनावट फेसबुक अकाऊंट काढण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सोबतच कोणीही फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा

Pune Crime News : सायबर चोरांच्या रडारवर पुण्याचे जिल्हाधिकारी? बनावट फेसबुक अकाऊंट काढून करत आहेत मेसेज

[ad_2]