Live Location Sharing Feature Now Available In Google Maps Will Be Beneficial While Travelling Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : व्हॉट्सअॅपप्रमाणे (Whatsapp) गुगल मॅपमध्ये लाईव्ह लोकेशन (Live Location) शेअर करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. आता तुम्हाला मित्र किंवा कुटुंबासोबत प्रवास करताना इतर अॅप्ससह लाइव्ह लोकेशन शेअर करण्याची गरज नाही. हे काम तुम्ही गुगल मॅप्सच्या माध्यमातून कितीही काळ सहज करू शकता. यामध्ये तुम्हाला लोकेशन शेअर करताना वेळ सेट करण्याचा पर्यायही मिळतो. वेळ मर्यादा पूर्ण झाल्यानंतर तुमचे लाईव्ह लोकेशन सहज बंद होते. तुम्ही तुमचे लाइव्ह लोकेशन कसे शेअर करु शकाल याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

असा करा गुगल मॅप्समधून शेअर करा लाईव्ह लोकेशन 

Google Maps वर लाईव्ह लोकेशन शेअर करण्यासाठी तुम्हाला Maps मध्ये एकमेकांना मित्र म्हणून सूचीबद्ध करावे लागेल किंवा तुम्ही याशिवाय तुमच्या Google संपर्कांमध्ये स्थान शेअर करू शकता. तुम्हाला तुमचे लोकेशन शेअर करण्यासाठी आधी गुगल मॅप्स ओपन करावे लागेल. त्यानंतर वरच्या बाजूस उजवीकडे क्लिक करावे लागेल.  तिथे शेअर लोकेशन असा पर्याय तुम्हाला येईल. इथून तुम्हाला हव्या त्या व्यक्तीला तुमचं लाईव्ह लोकेशन शेअर करता येणार आहे. 

गुगल मॅप्समध्ये अपडेट आणण्यासोबतच कंपनी यूजर्सची प्रायव्हसी सुधारण्यासाठी काम करत आहे. आतापर्यंत कंपनी मॅपची माहिती क्लाउडमध्ये साठवायची, पण आता तुम्हाला ती फोनमध्ये स्टोअर करण्याचा पर्याय असेल ज्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील. कंपनी व्हॉट्सअॅपमध्येही अशीच सुविधा देते जिथे तुम्ही तुमचे लाइव्ह लोकेशन शेअर करू शकता. परंतु, येथे तुम्हाला फक्त 8 तासांचा पर्याय मिळेल. यानंतर शेअरिंग आपोआप थांबते. पण गुगल मॅपच्या बाबतीत असे नाही. येथे तुम्ही तुम्हाला हवे तेवढे दिवस लोकांशी कनेक्ट राहू शकता.

व्हॉट्सअॅपमध्ये येणार नवीन फिचर

बिझनेस टुडेच्या अलीकडील अहवालात, डब्ल्यूए बीटा इन्फोने म्हटले आहे की, नंबर शेअर करण्याची समस्या आता लवकरच दूर होणार आहे. कारण व्हाट्सअॅपने यावर उपाय शोधलाय. असं सांगितले जात आहे की,  व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे लोकांना त्यांचा फोन नंबर न सांगता चॅट करता येईल. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप यूजर्स लवकरच या फीचरचा वापर करू शकतील. या फिचरचा वापर करुन युजर्स एक युनिक असं युजरनेम तयार करु शकतील. ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रोफाईलबाबत अधिक गोपनीयता बाळगता येईल. तसेच युजर्सना त्यांचा फोन नंबर देखील लपवता येणार आहे आणि फोन नंबर न दाखवता देखील युजर्सना चॅट करता येणार आहे. अँड्रॉइड आणि वेब यूजर्सना लवकरच या फिचरचा वापर करता येऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. 

हेही वाचा : 

WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅपमध्ये येतंय नवं फिचर, आता फोन नंबरही लपवता येणार, युनिक युजरनेमने होऊ शकतील सगळी कामं

[ad_2]

Related posts