Transporters Strike Many Parts Of Maharashtra State Faced Shortage Of Petrol Diesel Stock Due To Transporters Strike Against New Motor Vehicle Act

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Petrol Diesel Shortage Maharashtra : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या ( New Motor Vehicle Act) विरोधात राज्यातील मालवाहतूक करणाऱ्या ट्रक-टँकर चालकांनी संप (Transporters Strike) पुकारला आहे. 3 जानेवारीपर्यंत हा संप सुरू राहणार आहे. मात्र, त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. टँकर चालकही या संपात सहभागी असल्याने राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेलचा तुटवडा भासू लागला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाबाहेर टाकी फूल्ल करण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर, दुसरीकडे हा संप लांबल्यास एसटी महामंडळाच्या वाहतुकीवरही इंधन अभावी परिणाम होण्याची भीती आहे. 

मालवाहतूकदारांच्या संपात पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी सहभाग घेतला आहे. पेट्रोल डिझेल तुटवडा पडू शकतो म्हणून पेट्रोल पंपावर लांबच रांगा पाहायला मिळत आहे.

मनमाडमधून इंधन पुरवठा नाही, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला फटका बसणार

मालवाहतूकदारांच्या संपाचा परिणाम मंगळवारी 2 जानेवारी रोजी, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. मनमाडहून या जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होतो. मात्र, मनमाडमध्ये वाहतूक ठप्प आहे. 

लातूर शहरातील पेट्रोलचा साठा संपला

ट्रकचालकांच्या संपाचे परिणाम पेट्रोल पंपावर पाहायला मिळत आहेत. ट्रक चालकांना संप केल्यामुळे पेट्रोल येणार नाही त्यामुळे लोक आपल्या गाड्या पेट्रोल ने फुल करत आहेत. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल संपले तर अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांनी मोठ्या रांगा लागल्या आहेत. लातूर शहरातील एमआयडीसी,गाव भाग ,औसा रोड ,अंबाजोगाई रोड आणि नांदेड रोड भागातील सर्वच पेट्रोल पंप वरील पेट्रोल संपले आहे. त्यामुळे सर्व पंप बंद आहेत.. लोक बंद पंपासमोर उभे आहेत. 

पुण्यात पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत 

पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील देखील सर्व पेट्रोल पंप सुरळीत चालू राहणार असल्याची माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशनने दिली आहे. राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नाही असेही असोसिएशनने स्पष्ट केले आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्येही वाहनांच्या रांगा, एसटीवरही परिणाम होण्याची शक्यता

ट्रक चालकांनी संप केल्यामुळे पेट्रोल येणार नाही. त्यामुळे लोक आपल्या गाड्यांच्या पेट्रोल टाकी फुल करत आहेत. त्यामुळे शहरातील काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपले आहे. तर अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत.  एसटी महामंडळाकडे दोन दिवस पुरेल एवढा डिझेल साठा आहे.  दोन दिवसापेक्षा अधिक संप लांबल्यास एसटीवर परिणाम होऊ शकतो अशी भीती एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी दिली आहे. 

हिंगोली पेट्रोल पंपावर मोठी गर्दी 

उद्यापासून, मंगळवार 2 जानेवारीपासून सर्व खाजगी बसचे चालक यासह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालक सुद्धा संपावर जाणार आहेत त्यामुळे इंधनची वाहतूक सुद्धा बंद राहणार आहे परिणामी हिंगोली जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचा तुटवडा जाणू शकतो परिणामी पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे संपाचा सुरू राहिला तर पेट्रोल डिझेलचा मोठ्या प्रमाणात फुटवडा जाणू शकतो पुढील दोन दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा पेट्रोल पंपावर शिल्लक आहे तर काही पेट्रोल पंप वरील इंधन पूर्णपणे संपले असल्यामुळे बंद आहे. 

अकोल्यात वाहनांच्या रांगा

अकोल्यातील अनेक पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या मोठ्या रांगा. तीन दिवस ट्रांसपोर्ट व्यायसायिकांचा संप असल्याने वाहनधारकांची गर्दी. इंधनाचा साठा संपलेल्या काही पेट्रोलपंप मालकांनी पेट्रोल पंप बंद ठेवले आहेत. 

भंडाऱ्यात 250 बस फेऱ्या रद्द 

टँकर चालकांनी पुकारलेल्या बंदचा फटका थेट भंडारा आगारातून सुटणाऱ्या बसवर पडला आहे. भंडारा आगारातील नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या सकाळपासून सुमारे 250 बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. या बस फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे 7 लाखांचा फटका भंडारा आगाराला बसला असून यात प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. अगदी सकाळपासून भंडारा आगारात अनेक प्रवासी नागपूरच्या दिशेने प्रवास करण्याकरिता पोहोचलेत. अनेकांनी बसमध्ये तिकीटही काढलेत. मात्र, त्यानंतर वाहकांनी काढलेले त्यांचे तिकीट रद्द करीत त्यांना तिकिटाचे पैसे परत केलेत. बराच वेळपर्यंत प्रवाशांना नागपूरच्या दिशेनं कुठलीही बस मिळाली नसल्यानं अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.

नवीन कायद्यात आक्षेप कशावर?

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. भारतात 28 लाखांहून अधिक ट्रक चालक 100 अब्ज किलोमीटरचे अंतर कापतात. या ट्रकवर 50 लाखांहून अधिक लोकं काम करतात. अशा परिस्थितीत ट्रकमुळे होणारे रस्ते अपघातही सर्रास घडत आहेत. त्यामुळेच सरकारने नवीन कायदा आणला असल्याचे बोलले जात आहे. 

[ad_2]

Related posts