[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पंढरीची वारी आहे माझे घरी… याचा प्रत्यय आज पुणेकर घेत आहेत. आज देहूमधून संत तुकोबारायांची पालखी इनामदार वाड्यातून आकुर्डीकडे प्रस्थान ठेवणार आहे. तर आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहे. त्यामुळे हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. पालखी सोहळ्यासाठी इंद्रायणीचे दोन्ही काठ भाविकांच्या मांदियाळीने फुलून गेले आहेत. शिवाय पालखीसाठी बेळगावजवळच्या अंकली येथून माऊलींचे मानाचे अश्व आळंदीत दाखल झाले असून माऊलींच्या रथाला नवी झळाळी देण्यात आलीय. ज्ञानोबा माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला सुरवात झाली, पालखी पहिला मुक्काम सोहळा आजोळघरी म्हणजे आळंदीतच असेल. </p>
<p> </p>
[ad_2]