Kamlatai Pardeshi Founder Of Ambika Bachat Gat Ambika Masala Passed Away At The Age Of 63 At Sassoon Hospital Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : अंबिका मसाले (Ambika Masala)  ज्यांनी घराघरात पोहोचवणाऱ्या कमलताई परदेशी (Kamalatai Pardeshi Passed Away)  यांचे निधन झाले आहे. स्वतः निरक्षर असूनही बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अंबिका उद्योग समूह उभारला आहे. अंबिका उद्योग समूहच्या माध्यमातून घरात घरात पोहोचलेल्या कमल परदेशी यांचं निधन झाले आहे.  ब्लड कॅन्सर झाल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. दौंड तालुक्यातील खुटबाव या गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

 शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अंबिका मसाल्याच्या चेअरमन असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या कमलताई परदेशी यांचा प्रवास आहे.  2000 साली खुरपणीच्या कामातून दररोज मिळणाऱ्या पैशातून  मसाला व्यवसाय सुरू केला. कमलताईंनी   मसाल्याच्या व्यवसायाची सुरुवात आपल्या झोपडीतूनच सुरु केली.आता त्यांच्या मसाल्यांना परदेशात देखील मोठी मागणी आहे. 

सरकारी कार्यालये ते बिग बाझारमध्ये मसाल्यांची विक्री 

सुरुवातीला पुण्यातल्या सरकारी कार्यालयाबाहेर त्यांनी मसाले विकले. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबईतल्या प्रदशर्नांमध्ये आणि मग बिग बाझारमध्ये मसाल्यांची विक्री केली. आदर्श उद्योजिका सहित मिळालेले अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. जर्मनीच्या चांसेलार अँगेला मर्केल यांनीही कमलताईंच्या कामाचं कौतुक केलंय.

अंबिका मसाल्याचा सुगंध जर्मनीत

कमलाताईंच्या अंबिका मसाल्याचा सुगंध नाबार्ड बँकेपर्यंत गेला. नाबार्डच्या माध्यमातून जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल या मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी आमचा बचत गट अँजेला मर्केल यांना दाखवण्यासाठी नेला होता. त्यावेळी 14500 रुपयांचा चेक त्यांनी कमलाताईंना दिला होता. यावेळी अँजेला मर्केल यांनी भेटीवेळी कमलाताईंना अपेक्षा काय विचारल्या होत्या. त्यावेळी आम्हाला बाजारपेठ उपलब्ध करुन द्या, असं कमलताई म्हणाल्या. त्यानंतर जर्मनीत आमच्या अंबिका मलाल्याची विक्री होऊ लागली. त्यानंतर सुप्रियाताई सुळे देखील भेटल्या. त्यांनी मुंबईतल्या सर्व बिग बाजारला माल पोहोचवण्यास मदत केली.   

कमलाताईंच्या साधेपणाचे कायम कौतुक  

कमलताई परदेशी यांनी स्वत:चा मसाल्याचा आज ब्रँड तयार केला आहे. मात्र एवढा मोठा पल्ला गाठूनही त्यांच्या साधेपणाचे कायम कौतुक होत असे. कारण कमलताईंना आपल्या सहकारी महिलांना चांगली घरं बांधून दिली मात्र त्या आजही साध्या घरात राहत होत्या. घर ते फॅक्टरी हा प्रवास  त्या रोज पायी पूर्ण करत होत्या. 

                                    

[ad_2]

Related posts