How To Make Attractive Resume For Job Never Make These Mistakes In Your Resume

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Attractive Resume : तुम्ही जर नोकरीसाठी (Job) अर्ज करण्याचा (How To Make Attractive Resume) विचार करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा रेझ्युमे HR विभागाकडे पाठवावा लागतो. हल्ली तरुणाई विचार न करता रिझ्युमे तयार करून नोकरीसाठी अर्ज करताना दिसतात. एकदा रेझ्युमे तयार केला की तो पुन्हा वाचणे त्याला आवश्यक वाटत नाही, ज्याचा थेट परिणाम त्याच्या नोकरीवर होतो. आज आम्ही तुम्हाला रेझ्युमेमधील त्या दोन चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या अनेकदा नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांकडून केल्या जातात. हे पाहून उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी कोणतीही तयारी केलेली नाही, हे मुलाखतकाराला समजते. जाणून या दोन चुका कोणत्या? पाहुयात… 

महत्वाचीच माहिती लिहा!

कुठल्याही कंपनीला कामासाठी चांगल्या कर्मचाऱ्याची गरज असते. त्यामुळे रेझ्युमेमध्ये त्या गोष्टी लिहा, ज्या आवश्यक आहेत. अनेकदा उमेदवार रिझ्युमेमध्ये अधिक माहिती टाकतात. अनेकद आपण अनावश्यक माहिती त्यात टाकतो. त्यामुळे  रेझ्युमे प्रभावी दिसत नाही. आपल्याला ज्या पदासाठी रेझ्युमे पाठवायचा आहे. त्या पदासाठी आवश्यक असणारी माहिती रेझ्युमेमध्ये आवर्जून द्यावी. शिवाय काही Key points देखील हायलाईट करायला विसरु नका. त्यासोबतच तुमचा रेझ्युमे 2 पानांपेक्षा जास्त नसावा.

जास्त स्टायलिश रिझ्युमे तयार करु नका!

सध्या रेझ्युमे तयार करण्यासाठी अनेक बेवसाईट्स उपलब्ध आहेत. त्यातील विविध प्रकारचे टेम्लेट्स वापरुन अनेकजण रेझ्युमे तयार करतात. सगळं रेडिमेट मिळत असल्याने त्यातलीच एखादी चांगली डिझाईन वापरुन अनेकजण रेझ्युमे तयार करतात. यात वेगळं  आणि चांगलं रेझ्युमे तयार करण्याच्या नादात आपण स्टायलिश रेझ्युमे तयार करतात. मात्र तुमच्या स्किल्समध्ये कंपनीला इंट्रेस्ट असतो. तुम्ही डिझाईन केलेल्या रेझ्युमेमध्ये कंपनीला इंट्रेस्ट नसतो. त्यामुळे रेझ्युमे तयार करताना वाचायला सोपा असा फॉन्ट निवडण्याचा सल्ला दिला जातो. जेवढा साधा, सोपा , सरळी रिझ्युमे तयार कराल तेवढं चांगलं राहिलं. 

विविध अॅप्स आणि वेबसाईट्स उपलब्ध

कॅनव्हा सारख्या अनेक वेबसाईट्स उपलब्ध आहेत. ज्यात आपण अगदी प्रोफेशनल रेझ्युमे तयार करु शकतो किंवा रेझ्युमे तयार करण्यासाठी वेगवेगळे AI टूल्सदेखील उपलब्ध असतात. यातदेखील तुम्ही चांगले रेझ्युमे तयार करु शकता. फक्त रेझ्युमे तयार करताना साधा आणि नीटनेटका असायला हवा एवढं नक्की. 

इतर महत्वाची बातमी-

Apple : आनंदवार्ता! आतापर्यंतच्या सगळ्यात कमी किंमतीत मिळणार iPhone 15 आणि MacBook , सुरु होणार Apple Days Sale

 

 

 

 

 

[ad_2]

Related posts