How Can Chennai Super Kings Qualify in IPL 2023 playoffs Know The Scenario; धोनीची CSK प्लेऑफमधून होऊ शकते बाहेर? MI, RCB आणि PBKS चं चक्रव्यूह

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: आयपीएल २०२३मध्ये ६१ सामने झाले आहेत आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे अजून कोणताही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकलेला नाही. गुणतालिकेत गुजरात टायटन्स १६ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज १५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रविवारी चेन्नईला हरवून कोलकाता नाईट रायडर्सने धोनीच्या अडचणी वाढवल्या आहेत. १३ सामन्यांपैकी ७ सामने जिंकल्यानंतर चेन्नईचे १५ गुण आहेत आणि अजूनही ते प्लेऑफसाठी पात्र ठरलेले नाही. पण टॉप-२ मध्ये असूनही चेन्नईचा संघ अजूनही प्लेऑफमधून बाहेर पडू शकतो, कसं ते जाणून घेऊया.चेन्नईचा पराभव

दुर्दैवाने सीएसकेने एमए चिदंबरम स्टेडियमवर शेवटचा घरच्या मैदानावरील गमावला. सुनील नारायण (२/१५) आणि वरुण चक्रवर्ती (२/३६) यांच्या धारदार गोलंदाजीनंतर नितीश राणा आणि रिंकू सिंग यांच्या अर्धशतकांच्या जोरावर कोलकाताने मैदानावर मजल मारली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एमएस धोनीचे संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न अजूनही अपूर्ण राहू शकते.

चेन्नईसमोर चक्रव्यूह

चेन्नईचा संघाला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. हा सामना शनिवारी (२० मे) दिल्लीत खेळवला जाणार आहे. धोनीचा संघ या सामन्यातही जर हरला तर तो स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. यासाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी चक्रव्यूह आधीच रचले आहे.

२० मे ना होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात CSK पराभूत झाल्यास केवळ १५ गुण त्यांच्याकडे असतील. गुजरात टायटन्स १६ गुणांसह गुणतालिकेत सीएसकेपेक्षा आधीच पुढे आहे. आता त्या संघांबद्दल बोलू जे १५ गुणांच्या पुढे जाऊ शकतात. मुंबई, बंगळुरू आणि पंजाब या तीन संघांना चेन्नईच्या पुढे जाण्याची संधी आहे.

मुंबई इंडियन्सचे सामने

१६ मे : LSG vs MI
२१ मे : MI vs SRH

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे वेळापत्रक

१८ मे : SRH vs RCB
२१ मे: RCB vs GT

पंजाब किंग्जचे उर्वरित वेळापत्रक

१७ मे: DC vs PBKS
१९ मे: PBKS vs RR

मुंबई, पंजाब आणि बॅंगलोर

मुंबई इंडियन्सचा संघ जास्तीत जास्त १८ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. तर बँगलोर आणि पंजाबचा संघ जास्तीत जास्त १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. जर मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जने त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले तर ते अनुक्रमे १८, १६ आणि १६ गुणांसह गुणतालिकेत स्थान मिळवतील. दुसरीकडे, चेन्नईने शेवटचा सामना गमावल्यास त्यांचे १५ गुण शिल्लक राहतील.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

प्लेऑफमधून बाहेर होणार CSK?

हे संपूर्ण चित्र पुढे जाऊन असेच दिसेल, हे सांगणे कठीण आहे. परंतु संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील. इथून पुढे गुणतालिकेत काहीही होऊ शकते यात शंका नाही. गेल्या मोसमात, आपण पाहिले आहे की अनेक वेळा अव्वल असलेला संघ शेवटच्या क्षणी टॉप-2 मधून बाहेर पडला, तर काही संघ निव्वळ धावगतीच्या आधारावर प्लेऑफमध्ये पात्र ठरू शकले नाहीत. चेन्नईने दिल्लीविरुद्ध विजय मिळवला तर त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

[ad_2]

Related posts