KKR Won The Match Against CSK Because Of One Trick Of Coach Chandrakant Pandit ; धोनीच्या चलाखीवर भारी पडले KKRचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : महेंद्रसिंग धोनी हा किती चलाख आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. धोनीच्या चाणाक्षपणाच्या जोरावर चेन्नईच्या संघाने आतापर्यंत बरेच सामने जिंकले आहे. पण या सामन्यात धोनीच्या चलाखीवर केकेआरचे कोच चंद्रकांत पंडीत भारी पडल्याचे पाहायला मिळाले. कारण पंडीत यांच्या फक्त एका युक्तीच्या जोरावर केकेआरने चेन्नईच्या संघाला पराभूत केल्याचे समोर आले आहे.केकेआरच्या संघाने सामना जिंकला आणि त्यानंतर कर्णधार नितिश राणाने याबाबतची माहिती दिली. कारण चेन्नईच्या संघाने टॉस जिंकला होता आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कारण चेन्नईची खेळपट्टी संथ होत जाणारी होती आणि दुसऱ्या डावात जास्त धावा करता आल्या नसत्या. त्यामुळेच धोनीने प्रथम फलंदाजी घेतली होती. पण धोनीच्या या चलाखीवर पंडीत यांची युक्ती भारी पडली.

राणाने सांगितले की, ” हा सामना चांगलाच रंगतदार झाला. ही खेळपट्टी संथ होणार होती आणि त्यामुळे धावांचा पाठलाग करणे सोपे नव्हते. पण त्याचवेळी प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत यांनी दिलेला एक सल्ला चांगलाच कामी आला. पंडीत सरांनी मला हेव्ही रोलर मारायला सांगितला होता. आम्ही फलंदाजीला जाण्यापूर्वी खेळपट्टीवर दव पडले होते. त्यामुळे जेव्हा हेव्ही रोलर मारण्यात आला तेव्हा दव खेळपट्टीमध्ये भिनले गेले आणि त्यामुळे चेंडू हा योग्यपद्धतीने बॅटवर यायला लागला. खेळपट्टी संथ असली तरी पंडीत सरांनी जी गोष्ट सांगितली त्यामुळे फलंदाजी करणे आम्हाला जास्त कठीण गेले नाही.”

धोनीनेही सामना संपल्यावर हीच गोष्ट सांगितली. खेळपट्टी ही संथ होत चालली होती. पण या खेळपट्टीवर जर आमच्या १८० धावा असल्या असत्या तर आम्ही हा सामना जिंकू शकलो असतो. त्यामुळे खेळपट्टी ही संथ होत जाणारी होती. पण जर चेन्नईच्या संघाने १८० पेक्षा जास्त धावा केल्या असत्या तर त्यांना विजय मिळवता आला असता. आता दोन्ही संघ प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत आणि दोन्ही संघांसाठी प्रत्येकी एक सामना शिल्लक आहे.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

चेन्नईचा संघ हा १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर केकेआरचा संघ १२ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

[ad_2]

Related posts