Crime News Pune Heist Caught On Camera Thief Steals Gold Worth Rs 3 Crore Raviwar Peth Area Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime News Update : 2023 वर्षांचा निरोप घेताना अन् नव्या वर्षाचं स्वागत करतानाच पुण्यात दरोड्याची (Pune Crime News) मोठी घटना घडली आहे. चोरांनी सोन्याच्या दुकानावर डल्ला मारत तब्बल तीन कोटींचं सोनं लंपास (Jewellery worth 3 crore was stolen) केलेय. या घटनेचा CCTV फुटेज समोर आलेय. ही घटना पुण्यातील रविवार पेठ परिसरात (Raviwar Peth area) घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. NDTV ने याबाबतचं वृत्त दिलेय. 

5 किलो सोनं लंपास – 

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठमधील सोन्याच्या दुकानात चोरट्यांनी दरोडा टाकला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज मिळालेय. 31 डिसेंबर रोजी रात्री चोरांनी सोन्याच्या दुकानावर डल्ला मारला. चोरांनी 5 किलो सोनं लंपास केले. दुकानदाराच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. 

दहा लाख रुपयांवरही टाकला डल्ला – 

सोन्याच्या दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, चोरांनी पाच किलो सोन्यासोबत दहा लाख रुपयांचीही चोरी केली. चोरांनी 31 डिसेंबर रोजी दुकानात दरोडा टाकलाय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर पांढऱ्या रंगाची हुडी (टोपी) घालून आल्याचे दिसतेय. चोरांनी लॉकर तोडून त्यामधील सोनं बॅगमध्ये भरत असल्याचे दिसतेय. चोरांनी सगळं लॉकर रिकामं केलेय. 

चोरांकडे दुकानाची बनावट चावी ? 

पोलिसांनी या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. चोरांना बेड्या ठोकण्यासाठी पुणे पोलिसांनी एका पथकाची नेमणूक केली आहे. चोरांकडे सोन्याच्या दुकानाची बनावट चावी होती, त्याच्या मदतीने त्यांनी दुकानात दरोडा टाकल्याचेही समोर आलेय. 

दुकानातील कर्मचाऱ्याचा सहभाग ?

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पांढरी हुडी घातलेला चोर लॉकर उघडताना दिसत आहे, जिथे सोने ठेवले होते. त्यानंतर चोरलेले सोने आणि पैसे घेऊन त्याने धूम ठोकली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने दुकानातील सोन्याने भरलेले संपूर्ण लॉकर साफ केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसतेय. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सोन्याच्या शोरूमचा एका कर्मचारी या चोरीत सहभागी असू शकतो. कारण शोरूममध्ये जबरदस्तीने प्रवेश केल्याचे कोणतेही पुरावे दिसत नव्हते. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चोरट्याचा माग काढण्यासाठी आणि पकडण्यासाठी अधिकाऱ्यांची टीमही तयार करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा चुड्पा यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठ परिसरात 31 डिसेंबर रोजी चोरीची घटना घडली होती. दुकानात जबरदस्तीने प्रवेश नव्हता; त्याऐवजी, अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश करण्यासाठी डुप्लिकेट चावी बनवल्याचे दिसतेय.

आणखी वाचा :

Pune Rape Case : पुण्यात रोज एका महिलेवर अत्याचार? शहरात घटनांचा वाढता आलेख; धडकी भरवणारी आकडेवारी समोर 

[ad_2]

Related posts