Made In India Phoone TECNO POP 8 Stereo Speakers Launched In India For 6499 Rupee

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

TECNO POP 8 launched in India : भारतात बजेट (smartphone) नुसार स्मार्टफोनची मागणी नेहमीच जास्त असते.  आपल्या देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना 5 ते 10 हजार रुपयांमध्ये चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे, परंतु त्यांना बहुदा चांगले पर्याय मिळत नाहीत.  जर तुम्हीही अशा यूजर्समध्ये असाल तर आज  आम्ही एका नवीन लाँच झालेल्या बजेट स्मार्टफोन बद्दल सांगणार आहोत. 

टेक्नो कंपनीने गेल्या काही वर्षांत भारतात खूप नाव कमावले आहे.  या कंपनीने कमी किमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन लाँच  करून बजेट रेंजमध्ये आपलं वेगळं नाव कमवलं.  यावेळीही टेक्नोने तेच केले आहे.  आज   या कंपनीने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्यामध्ये सगळे भन्नाट फिचर्स असूनही, त्याची किंमत फक्त 5,999 रुपये आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे  हा मेड इन इंडिया स्मार्टफोन आहे.

कमी किमतीत झालाय स्मार्टफोन लाँच 

या फोनचे नाव Tecno Pop 8 असे आहे. या फोनमध्ये 6.56 इंच एचडी प्लस डिस्प्ले आहे, जो डॉट-इन डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश दर 90 हर्ट्ज आहे.  या फोनमध्ये डायनॅमिक पोर्ट फीचर आहे, जे आयफोनच्या डायनॅमिक आयलँड फीचरप्रमाणे काम करते, ज्याद्वारे यूजर्सना त्वरित नोटिफिकेशन्स मिळतात.  फोनचा फ्रंट पॅनल पांडा ग्लास प्रोटेक्शनसह येतो. 

या फोनमध्ये Unisoc T606 SoC चा वापर करण्यात आला आहे, जो 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येतो, पण फोनमध्ये 4GB एक्स्टेंडेड रॅम देखील देण्यात आली आहे. या फोनची रॅम 8GB पर्यंत असू शकते.  मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.  हा फोन Android 13 Go Edition वर सर्वोत्तम OS HioS 13 वर चालतो.

कॅमेरा, बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

या फोनच्या मागील बाजूस 12MP ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो ड्युअल एलईडी लाइटसह येतो.  फोनच्या पुढच्या भागात 8MP सेन्सर देण्यात आला आहे आणि पुढच्या बाजूला देखील यूजर्सना ड्युअल एलईडी स्लिट फ्लॅशलाइटची सुविधा मिळेल.फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येते.  याशिवाय फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G VoLTE, Wi-Fi 802.11, Bluetooth 5.0, GPS आणि USB Type-C कनेक्टिव्हिटी सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

कलर, किंमत, ऑफर आणि विक्री

हा फोन ग्रॅविटी ब्लॅक आणि मिस्ट्री व्हाइट कलर पर्यायांमध्ये देण्यात आला आहे.  कंपनीने या फोनचा एकमेव व्हेरिएंट लॉंच केला आहे, ज्याची किंमत 6,499 रुपये आहे, परंतु मर्यादित काळासाठी, या फोनची एक विशेष किंमत ठेवण्यात आली आहे, जी 5,999 रुपये आहे.  ही स्पेशल प्राइज बँकेच्या ऑफर्स सोबत देण्यात येइल.  या फोनची विक्री Amazon वर 9 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

LG AI Robot : फिरायला गेल्यावर घराची चिंता विसरा; LG ने तयार केला एआय होम असिस्टंट रोबोट; घरातील पाळीव प्राण्यावरही ठेवणार लक्ष!

 

 

[ad_2]

Related posts