Virat Kohli Folding Hands When Ram Siya Ram Song Played Video Watch Keshav Maharaj Ind Vs Sa 2nd Test

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat kohli ram siya ram : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहचलाय. कसोटीच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांनी मिळून 23 विकेट गमावल्या होत्या. आफ्रिकेने (SA vs IND) प्रथम फलंदाजी करताना फक्त 55 धावांपर्यंत मजल मारली. भारताच्या भेदक माऱ्यापुढे एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत गेले. याचवेळी विराट कोहलीची एक रिअॅक्शन चर्चेत आली आहे. केशव महाराज फलंदाजीला आल्यानंतर राम सिया राम हे गाणं वाजलं. त्यानंतर विराट कोहली याने हात जोडले. त्याची रिअॅक्शन चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

दक्षिण आफ्रिकाची फलंदाजी सुरु असताना 16 व्या षटकात ही घटना घडली. जेव्हा दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 34 धावांवर सहावी विकेट गमावली. मार्को यान्सन (0) बाद झाल्यानंतर केशव महाराज क्रीजवर पोहोचला. भारतीय वंशाचा केशव महाराज हा श्री राम आणि हनुमानजींचा भक्त आहे. केशव महाराज क्रिझवर आल्यानंतर मैदानावर राम सिया राम, हे गाण वाजू लागले. यादरम्यान विराट कोहलीने कथ्थक स्टाईलमध्ये धनुष्य-बाणाचे हावभाव केले आणि प्रेक्षकांना हात जोडून अभिवादन केले. विराट कोहलीची ही रिअॅक्शन चर्चेत आहे.  केशव महाराज 13 चेंडूत केवळ तीन धावा काढून बाद झाला. त्याला मुकेश कुमारने तंबूत धाडले.

पाहा व्हिडीओ 

भारत आणि आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघाचा पहिला डाव आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 55 धावांत आटोपला. मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. 55 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताचाही डाव कोसळला. केपटाऊन कसोटीच्या पहिल्याच दिवशी तब्बल 23 फलंदाज तंबूत परतले, हा एक विक्रमच झालाय. 

दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात फक्त 55 धावा करु शकला. मोहम्मद सिराज याने सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला 20 धावसंख्याही पार करत आली नाही. भारताविरोधात दक्षिण आफ्रिका संघाने निचांकी धावसंख्या नोंदवली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आफ्रिकेचा भारताविरोधातील ही सर्वात कमी धावसंख्या होय. पहिल्या दिवशी तब्बल 23 फलंदाज बाद झाले. भारताचे 10 आणि आफ्रिकेचे 13 फलंदाज माघारी परतले. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ रोमांचक होण्याची शक्यता आहे. एडन मार्करम तळ ठोकून मैदानावर आहे. मार्करमच्या खेळावर आफ्रिकेची मदार अवलंबून आहे. 



[ad_2]

Related posts