Maharashtra Cabinet Decisions Cm Eknath Shinde Devendra Fadanvis Ajit Pawar Atal Setu Mumbai Trans Harbour Link Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे दहा निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूवर 250 रुपयांचा टोल निश्चित करण्यात आलाय. त्याशिवाय दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याशिवाय इतरही महत्वाचे निर्णय घेण्यात आलाय.  

शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या वतीनं दहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या (Shinde-Fadnavis-Pawar Government) राज्य मंत्रिमंडळाची (State Cabinet) मंत्रालयात आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय ( संक्षिप्त )

नोव्हें २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हें २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय. कर्मचाऱ्यांना दिलासा

( वित्त विभाग) 

अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी 250 रुपये

( नगरविकास विभाग ) 

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान. 

( दुग्धव्यवसाय विकास)

विदर्भातील  सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार 

( जलसंपदा विभाग) 

मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता. 

( वित्त विभाग) 

पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान . ४०० उद्योगांना फायदा 

( वस्त्रोद्योग) 

रेशीम उद्योगाच्या विकासासाठी ” सिल्क समग्र २” योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ 

( वस्त्रोद्योग विभाग)

द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार

( उद्योग विभाग)

नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीस मान्यता

( परिवहन विभाग) 

सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला

( सहकार विभाग)

[ad_2]

Related posts