[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ICC amended the rules of cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. हे बदल सब्स्टीट्यूट आणि स्टंपिंगशी संबंधित आहेत. नवीन नियमांनुसार, पंच आता डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम (Decision Review System) रेफरल्स दरम्यान यष्टीमागच्या कॅचचा विचार न करता स्टंपिंगसाठी फक्त ‘साइड ऑन रिप्ले’चे मूल्यांकन करतील.
The ICC has made a change in its playing conditions so TV umpires will no longer check for other forms of dismissal when a stumping appeal is referred by the on-field umpires 📺
👉 https://t.co/s3Y6S4robM pic.twitter.com/YCfYvCbnAI
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 4, 2024
नियमांमधील या सुधारणा 12 डिसेंबर 2023 पासून लागू झाल्या आहेत. स्टंप आऊट तपासादरम्यान एखाद्या संघाला विकेटच्या मागे झेलसाठी रेफरल घ्यायचे असेल तर त्याला वेगळा डीआरएस घ्यावा लागेल. स्टंपिंग तपासताना पंच यापुढे झेल तपासणार नाहीत. गेल्यावर्षी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेदरम्यान, ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने देखील डीआरएसचा वापर न करता स्टंपिंग केल्यावर विकेटच्या मागे झेल घेण्यासाठी रेफरलचा वापर केला होता. मात्र, आता नवीन नियम लागू झाल्यानंतर स्टंपिंगसाठी अपीलमध्ये केवळ बाजूचे फुटेज ऑन कॅमेरा दाखवले जाणार आहे. पंच फक्त त्याकडे पाहतील. चेंडू बॅटला लागला की नाही हे ते तपासणार नाही.
आयसीसीने बदली खेळाडूंना घेण्याबाबतचे नियमही स्पष्ट केले आहेत. आता बॉलिंग करताना मूळ खेळाडूला ‘कंक्शन’मुळे माघार घ्यावी लागली तरच बदली खेळाडूला गोलंदाजी करण्याची परवानगी असेल. यासह, जागतिक क्रिकेटच्या प्रशासकीय समितीने मैदानावरील दुखापतींचे मूल्यांकन आणि उपचारांसाठी चार मिनिटांचा वेळही निश्चित केला आहे.
आयसीसीच्या नियमांमधील या बदलांसह, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये ‘डेड बॉल’ आणि प्रति षटकात दोन बाऊन्सरचा नियम लागू केला आहे. रणजी स्पर्धेतही हा नियम लागू होईल.
इतर महत्वाच्या बातम्या
[ad_2]