Loksabha Election 2024 Ratnagiri Sindhudurg Constituency Candidate Will From BJP Said Narayan Rane Central Minister Detail Marathi News | Loksabha Election 2024 : रत्नागिरी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कुडाळ, सिंधुदुर्ग : संपूर्ण देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election 2024) वारे वाहतायत. त्यातच रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या मतदारसंघावरुन (Ratnagiri Sindhudurg Constituency) भाजप आणि शिंदे गटात जुंपल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. कारण या मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गटाकडून किरण सामंत (Kiran Samant) यांचं नाव पुढे येतंय, तर नारायण राणेंनी (Narayan Rane) या जागेवर उमेदवार भाजपचाच असणार असल्याची स्पष्टोक्ती केलीये. त्यामुळे पुन्हा एकदा एका जागेवरुन महायुतीमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. 

भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी कोणाच्याही नावाची चर्चा नाही. कुस्ती, खोखो आणि कबड्डी पण नाही. आमच्याकडे जे काही होईल ते सामोपचाराने होईल. पण खासदार आमचा असेल, आता जे टिवटिव करत आहेत त्यांची तोंड बंद होतील असा टोला उदय सांमंतांना लगावत नारायण राणेंनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. 

शिंदे गटाकडून किरण सामंतांच्या नावाची चर्चा

काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी याच जागेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण किरण सामंत (Kiran Samant) यांच्या खासदारकीसाठी उमेदवारी मागितली असल्याचं उदय सामंतांनी म्हटलं. त्यांना बहुमताने निवडून आणण्याचं आवाहनही उदय सामंत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलं होतं. त्यामुळे किरण सामंत यांच्या खासदारकी लढवण्याबाबतच्या चर्चेला दुजोरा दिला होता. त्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखील सामंतांच्या या वक्तव्याला पाठिंबा देत शिंदे गटाकडून उमेदवार हे किरण सामंत असतील असं म्हटलं. त्यामुळे शिंदे गटाकडून जरी उमेदवार निश्चित झाला तरी महायुतीच्या जागावाटपामध्ये ही जागा कोणाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

उमेदवार भाजपचाच असणार

लोकसभेच्या जागावाटपावरुन सध्या महायुतीच्या सरकारमध्ये बराच संभ्रम पाहायला मिळतोय. त्यातच अनेक लोकसभा मतदारसंघाच्या जागांवरुन महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामधील रत्नागिरी-सिंधुदुर्गचा मतदारसंघ एक असू शकतो. कारण शिंदे गटाकडून या जागेसाठी दावा केला जात असून उमेदवार देखील निश्चित करण्यात आलाय. पण या जागेवर उमेदवार हा भाजपचाच असेल असं वक्तव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं. काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय फडणवीसांच्या सांगण्यावरुन मागे घेतला होता. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून निलेश राणे यांना उमेदवारी मिळण्याच्या शक्यता देखील नाकारता येत नाहीत. पण या सगळ्यावर महायुती म्हणून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहणं गरजेचं असले. 

हेही वाचा : 

I.N.D.I.A Alliance : इंडिया आघाडीच्या संयोजक पदी नितीश कुमारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? उद्धव ठाकरेंची महत्त्वाच्या नेत्यांसोबत फोनवरुन चर्चा 

[ad_2]

Related posts