Meta S Threads Rocked 9 5 Crore Posts In 24 Hours Added More Than 5 Crore Accounts Twitter Memes Viral Threads Twitter Killer

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Threads vs Twitter : ट्विटरला (Twitter) टक्कर देण्यासाठी मेटाने नवा थ्रेड्स अ‍ॅप (Threads) लाँच केला आहे. थ्रेड्स अ‍ॅपकडे ट्विटर किलर अ‍ॅप म्हणूनही पाहिलं जात आहे. मेटा (Meta) च्या नुकत्याच लाँच झालेल्या थ्रेड्स अ‍ॅपला कोट्यवधी युजर्सने पसंती दर्शवली आहे. अवघ्या 24 तासांत थ्रेड्सवरील पोस्ट आणि युजर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. अवघ्या काही तासांत युजर्सने थ्रेड्स अ‍ॅपवर उड्या मारल्या आहेत. कोट्यवधी युजर्सने थ्रेड्स वापरायला सुरुवात केली आहे. यानंतर ट्विटरला टक्कर देणाऱ्या थ्रेड्स अ‍ॅपच्या मीम्स ट्विटरवरच व्हायरल झाल्या आहेत.

अवघ्या 24 तासांत Threads ची धमाल!

नेटकऱ्यांनी मीम्स व्हायरल करत ट्विटरला डिवचायला सुरुवात केली आहे. तर काहींनी ट्विटरचाच पर्याय उत्तम असल्याचं म्हटलं आहे. थ्रेड्सकडे ट्विटरला पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. एकीकडे ट्विटरकडून युजर्सवर वेगवेगळे निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यामुळे ट्विटरच्या पेड सर्व्हिस ऐवजी लोक थ्रेड्सला प्राधान्य देतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

थ्रेड्स अ‍ॅपवरील पोस्ट आणि युजर्समध्ये मोठी वाढ

मेटाच्या ट्विटर प्रतिस्पर्धी थ्रेड्सच्या 95 दशलक्षाहून अधिक पोस्ट आणि 50 दशलक्षाहून अधिक अकाऊंट्स सुरु करण्यात आले आहेत. थ्रेड्स हे इंस्टाग्रामने तयार केलेलं मायक्रोब्लॉगिंग अ‍ॅप आहे. द वर्ज (The Verge) च्या माहितीनुसार, अवघ्या 24 तासांत थ्रेड्सवर 95 दशलक्ष पोस्ट करण्यात आल्या आहेत आणि जवळपास 190 दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत. 

ट्विटरला टक्कर देणारं थ्रेड्स अ‍ॅप

मेटाने बुधवारी 100 देशांमध्ये iOS आणि Android युजर्ससाठी थ्रेड्स लाँच केलं. थ्रेड्स सध्या अ‍ॅप स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे. इंस्टाग्राम (Instagram) प्रमाणे, थ्रेड्सह युजर्स एकमेकांना फॉलो करू शकतात आणि मित्र आणि इन्फ्लुएनर्संसोबत कनेक्ट होऊ शकतात. तुम्ही थ्रेड्सवर 500 शब्दांपर्यंत पोस्ट करू शकता. यामध्ये तुम्हाला फोटो, GIF आणि 5 मिनिटांपर्यंतचे व्हिडीओ पोस्ट करता येतील.

नेटकऱ्यांकडून मीम्स व्हायरल

 

 

 

 

 

 



[ad_2]

Related posts