Not Sachin Tendulkar, Virat Kohli or MS Dhoni Who Is Richest Cricketer With Rs. 20000 Crore Net Worth; ना सचिन, ना धोनी, ना विराट; राजघराण्यातील हा खेळाडू आहे भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू; २० हजार कोटी नेटवर्थ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

२० हजार करोडपेक्षाही अधिक नेटवर्थ

२० हजार करोडपेक्षाही अधिक नेटवर्थ

बडोद्यातील एका माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटूची संपत्ती २०,००० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तो केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. दुसरीकडे, विराट कोहलीने नुकताच १००० कोटींचा टप्पा पार केला आहे.

राजघराण्याशी संबंध

राजघराण्याशी संबंध

आम्ही ज्या क्रिकेटपटूचा उल्लेख करत आहोत ते आहेत समरजितसिंह रणजितसिंह गायकवाड आहेत. ते बडोद्याच्या राजघराण्यातील असून ते बडोद्यातील माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनचे क्रिकेट प्रशासक आहेत. रणजी करंडक क्रिकेटमधील १९८७-८८ आणि १९८८-८९ हंगामातील सहा प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये समरजितसिंगने बडोद्यासाठी ६५ च्या सर्वोच्च धावसंख्येसह ११९ धावा केल्या.

जन्म आणि शिक्षण

जन्म आणि शिक्षण

२५ एप्रिल १९६७ रोजी जन्मलेले समरजितसिंह रणजितसिंह हे प्रतापसिंह गायकवाड आणि शुभांगिनीराजे यांचे एकुलते एक पुत्र आहेत. त्यांनी डेहराडूनमधील द दून स्कूलमध्ये शिक्षण घेतले, जिथे त्यांनी एकाच वेळी शाळेच्या क्रिकेट, फुटबॉल आणि टेनिस संघांचे नेतृत्व केले.

२०१२ मध्ये शाही जबाबदारी सांभाळली

२०१२ मध्ये शाही जबाबदारी सांभाळली

मे २०१२ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर, लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये पारंपारिक समारंभात २२ जून २०१२ रोजी समरजीत सिंह यांना महाराजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. लक्ष्मी विलास पॅलेस समरजीत सिंग यांच्या मालकीचा आहे. मोतीबाग स्टेडियम आणि वडोदरा येथील महाराजा फतेह सिंग संग्रहालय, तसेच राजा रविवर्मा यांची अनेक चित्रे, तसेच फतेहसिंहराव यांची जंगम मालमत्ता जसे की सोने, चांदी आणि शाही दागिने यासह राजवाड्याजवळील ६०० एकरहून अधिक स्थावर मालमत्ता त्यांच्याकडे आहे.

समरजीतसिंह यांचा विवाह

समरजीतसिंह यांचा विवाह

एवढेच नाही तर गुजरात आणि बनारसमधील १७ मंदिरांचे ट्रस्टही ते सांभाळतात. २००२ मध्ये, समरजितसिंह यांचा विवाह वांकानेर राज्याच्या राजघराण्यातील राधिकाराजे यांच्याशी झाला. या जोडप्याला दोन मुली आहेत. हे चौघेही शुभांगिनीराजे यांच्यासोबत भारतातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राहतात.

कोहलीचे नेटवर्थ

कोहलीचे नेटवर्थ

नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार विराट कोहलीची एकूण संपत्ती १,०५० कोटी रुपये आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मधून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) च्या फलंदाजाने एकूण १५ कोटी रुपये कमावले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या कमाईबद्दल बोलायचे तर कोहलीला प्रत्येक कसोटी सामन्यासाठी १५ लाख रुपये, प्रत्येक एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख रुपये आणि टी-२० सामना खेळण्यासाठी ३ लाख रुपये मिळतात. कोहलीचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) ‘A+’ करार आहे, ज्यामुळे त्याला वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात.

धोनी आणि सचिनचं नेटवर्थ किती

धोनी आणि सचिनचं नेटवर्थ किती

उपलब्ध असलेल्या अहवालांनुसार, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीची एकूण संपत्ती जवळपास १,०४० कोटी रुपये इतकी आहे. त्याच्या अनेक गुंतवणुकी, ब्रँड एंडोर्समेंट आणि आयपीएलमधून मिळणारा पगार यामुळे तो इथपर्यंत पोहोचला आहे. आयपीएल टीम सीएसकेकडून तो १२ कोटी रुपये पगार घेतो. तर दुसरीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची संपत्ती १३९० कोटी इतकी आहे.

[ad_2]

Related posts