[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
काही वर्षांपूर्वी सोनालीच्या वडिलांचं आजारानं निधन झालं. आई एकटी पडली. त्यामुळे सोनालीनं तिला बंगळुरुला आणलं. काही दिवस चांगले गेले. मात्र त्यानंतर सोनालीची आई आणि सासू यांच्यात वाद होऊ लागले. रोज होणाऱ्या वादांमुळे सोनालीनं नोकरी सोडली. घरात राहून किमान वाद टाळू हा विचार करुन तिनं नोकरीवर पाणी सोडलं. मात्र तरीही दोघींचे वाद थांबत नव्हते. रविवारीदेखील दोघींमध्ये वाद झाला. सोनाली आणि तिच्या पतीनं कसंबसं दोघींना समजावलं.
सोनालीचा पती त्याच्या आईला समजावत होता, तर सोनाली स्वत:च्या आईची समजूत घालत होती. ‘तू मला मारुन टाक. तेव्हाच ही रोजची भांडणं थांबतील आणि तुझं आयुष्य सुरळीत होईल,’ असं सोनालीच्या आईनं त्यावेळी म्हटलं. तेव्हा सोनालीनं आईला समजावलं. असं काहीबाही बोलू नकोस, असं म्हणत तिनं आईला शांत केलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा सोनालीची आई आणि सासू यांच्यात वाद झाला. सोनाली दोघींना समजवायला गेली. त्यावेळी सोनालीचा पती घरी नव्हता. तो कामाला गेला होता.
सोनालीनं सासूला दुसऱ्या खोलीत पाठवलं. त्यानंतर ती आईला स्वत:च्या खोलीत घेऊन गेली. तेव्हाही आईनं ‘तू मला मारुन टाक आणि मोकळी हो,’ असं म्हणण्यास सुरुवात केली. यानंतर सोनालीनं आईला झोपेच्या ९० गोळ्या खाऊ घातल्या. आईनं सोनालीला विरोध केला नाही. तिनं गोळ्या खाल्ल्या. यानंतर तिची प्रकृती बिघडली. आई तडफडू लागली. ते पाहून सोनालीनं आईचा गळा दाबून तिला संपवलं. यानंतर सोनालीनं आईच्या मृतदेहासह पोलीस ठाणं गाठलं आणि हत्येची कबुली दिली.
[ad_2]