GST Scam In Maharashtra Central GST Squad Raid In Chhatrapati Sambhaji Nagar In Connection With Gst Scam One Arrested

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

GST :  छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) केंद्रीय जीएसटी पथकाने (GST) मोठी कारवाई केली. 200 कंत्राटदारांनी मिळून जवळपास 40 ते 50 कोटींचा कर चुकवला असल्याची माहिती समोर आली आहे. बोगस कंपन्यांच्या बिलांद्वारे हा घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. 

जाफर कादर या व्यक्तीच्या नावाने एक बोगस कंपनी आहे. जिचा वापर कर चुकवण्यासाठी करण्यात आला होता. जीएसटी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 200 ते 250 कोटी रुपयांची बोगस बिले घेतली. सिमेंट विक्रीच्या 9 कंपन्या स्थापन केल्या. जवळपास 200 गुत्तेदारांनी या कंपनीची बिले घेतली. कागदावर असलेल्या कंपनीचा मालक असलेल्या कादरला अटक करण्यात आली आहे. त्याच्या बोगस कंपन्यातून कंत्राटदारांनी बिले दाखवली आहेत. 

केंद्रीय जीएसटी पथकाने 200 ते 250 कोटी रुपयांचा बोगस बिलांचा घोटाळा समोर आणला आहे. जालना जिल्ह्यात सिमेंट विक्रीच्या 8 ते 9  बोगस कंपन्या स्थापन करण्यात आल्यात. या घोटाळ्यातून 40 ते 50 कोटींचा जीएसटी  बुडवण्यात आल्याचा ठपका आहे. बिले घेणाऱ्या कंत्राटदारांचा शोध सुरू आहे. या घोटाळ्यात काही सीए यांचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घोटाळ्यात मराठवाड्यातील लातूर, धाराशीव वगळता 6 जिल्ह्यातील 200 कंत्राटदारांचा या घोटाळ्यात समावेश आहे. जाफर कादर ही व्यक्ती त्याच्या नावे 8-9 कंपन्या असून त्यातील एकही कंपनी अस्तित्वात नाही. बिले घेणाऱ्या कंत्राटदारांकडे रस्ते बांधकाम, पाणी पुरवाठ्याशी संबंधित बांधकाम आदी प्रकारच्या कामांची कंत्राटे होती. त्यामुळे या कंत्राटदारांनी किती दर्जेदार कामे केली आहेत, याबद्दल ही चर्चा सुरू झाली आहे. 

राज्यात याआधीदेखील जीएसटीशी संबंधित घोटाळे उघड

दरम्यान, याआधीदेखील राज्यात जीएसटी घोटाळा उघडकीस आला होता. सांगली जिल्ह्यात यापूर्वी विजयनगर येथे गुजरातमधील व्यापाऱ्याने खोबरं विक्री दाखवून विभगाला चार कोटी रुपयांचा चुना लावला होता. तसेच दुसऱ्या एका प्रकारात जतमध्येही एका शेतमजुराच्या आधार, पॅनचा वापर करुन कोट्यवधींची बोगस विक्री दाखवत जीएसटी चोरी केली होती. नाशिकमध्ये भंगार व्यापाऱ्यांचा 100 कोटींचा जीएसटी घोटाळा झाला असल्याची माहिती मिळत आहे. बनावट कागदपत्रांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवत फसवणूक झाल्याची माहिती समोर आली होती. 

[ad_2]

Related posts