Sonia Gandhi Will Consider Contest Election From Medak Seat Instead Of Raebareli Telangana Congress Pass Resolution On It Lok Sabha Election 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sonia Gandhi Lok Sabha Election 2024 :आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात उमेदवाराच्या निवडीपासून ते प्रचाराचाही समावेश आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या रायबरेलीतून (Raebareli) निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. तेलंगणा प्रदेश काँग्रेसने केलेल्या ठरावावरून ही चर्चा सुरू झाली आहे. सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढवावी असा ठराव करण्यात आला आहे. 

तेलंगणातील मेडक मतदारसंघातून सोनिया गांधी निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही याच जागेवरून निवडणूक लढवली होती. सोनिया गांधींनी तेलंगणातून निवडणूक लढवावी, असा ठराव आम्ही मंजूर केल्याचे काँग्रेस नेते मधु यक्षी गौर यांनी सांगितले. सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढवल्यास त्याचा फायदा संपूर्ण दक्षिण भारतात काँग्रेस-इंडिया आघाडीला होईल, असेही त्यांनी म्हटले. 

रायबरेली मतदारसंघावर कोणाचे वर्चस्व?

सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या खासदार आहेत. रायबरेली ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. गेल्या चार निवडणुकांत सोनिया येथून विजयी होत आहेत. येथील प्रत्येक निवडणुकीत त्यांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. ही जागा ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेसकडेच आहे. देशात आतापर्यंत झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांमध्ये 3 निवडणुका वगळता ही जागा प्रत्येक वेळी काँग्रेसकडे आहे. देशाच्या 72 वर्षांच्या निवडणूक इतिहासात उत्तर प्रदेशची रायबरेली ही जागा 66 वर्षांपासून काँग्रेसकडे आहे.

रायबरेलीतून कोण लढणार?

तेलंगणा काँग्रेसने केलेल्या ठरावावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर सोनिया गांधींनी रायबरेलीची जागा सोडली तर त्यांची मुलगी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या जागेवरून निवडणूक लढवतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी अलीकडेच प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले होते. राहुल गांधी या मतदारसंघातून तीनदा खासदार झाले आहेत. राहुल गांधी यावेळी अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही, याबाबत काँग्रेसने अद्याप काहीही स्पष्ट केले नाही. 

सध्या राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून खासदार आहेत. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. 

[ad_2]

Related posts