Aditya-L1 ISRO Gears Up To Put Aditya-L1 Spacecraft In Its Final Destination Orbit On Jan 6

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Aditya-L1 : ISRO ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठवलेल्या आदित्य L-1 बाबत मोठी माहिती समोर आली आहे. आदित्य L-1 अंतिम टप्प्यात आहे. आदित्य L-1 हे उद्या म्हणजे 6 जानेवारी 2024 रोजी  L-1 बिंदूवर पोहोचणार आहे. PTI या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. सूर्याच्या L-1 बिंदूला halo orbit म्हणतात. 2023 मध्ये इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य सौर वेधशाळा पाठवली होती.

 

आदित्य यान L1 पॉइंटमध्ये प्रवेश करण्याची अंतिम प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती इस्रो प्रमुखांनी दिली होती. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून आदित्य L1 चे 2 सप्टेंबर रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

सूर्याचे पहिले चित्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार

आदित्य-L1 वरून सूर्याचे पहिले चित्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार आहे. VELC ची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली आहे. इस्रोच्या सन मिशनमध्ये स्थापित VELC सूर्याचे एचडी फोटो घेईल. L1 पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू होतील. म्हणजे त्यात बसवलेली सर्व उपकरणे सक्रिय होतील. त्यानंतर आदित्य सूर्याचा अभ्यास सुरू करेल. या दरम्यान, आदित्यवरील सर्व उपकरणे सुरळीतपणे सुरू आहेत की नाही, याची चाचणीदेखील इस्रोकडून करण्यात येणार आहे. 

आदित्य L-1 मध्ये विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे, जेणेकरुन कोणत्याही परिस्थितीत यान सूर्याच्या कक्षात टिकू शकेल. आदित्य L-1 ची रचना खास प्रकारे करण्यात आली आहे, ते सूर्याच्या फार जवळ जाणार नाही, पण लॅरेंज पॉईंटवर  राहील आणि सूर्यावर संशोधन करेल. आदित्य L-1 ही एक प्रकारे स्पेस टेलिस्कोप आहे, जी स्पेसमध्ये खास पद्धतीने काम करेल.



[ad_2]

Related posts